एक्स्प्लोर

Anant-Radhika Pre-Wedding: प्री-वेडिंगमधील परफॉर्मन्सनंतर रिहाना लगेचच अमेरिकेला का परतली? पॉप सिंगरने सांगितले कारण

Anant-Radhika Pre-Wedding: रिहानाने 1 मार्च रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या कॉकटेल पार्टीत तिचा लाईव्ह परफॉर्मन्स दिला होता. पण ती लगेच परत अमेरिकेला परतली.

Anant-Radhika Pre-Wedding:  मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सची संपूर्ण जगभरात चर्चा झाली. 1 मार्चपासून ते 3 मार्चपर्यंत हा सोहळा रंगला होता. या सोहळ्याला बॉलीवूड, हॉलीवूडसह अनेक दिग्गजांनी हडेरी लावली होती. बील गेट्स, झुकेरबर्ग यांसारखी दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित होती.  हॉलिवूड पॉप सिंगर रिहानानेही (Rihanna) या सोहळ्यात हजेरी लावून जबरदस्त परफॉर्मन्स दिला.

रिहानाच्या गाण्यावर जवळपास संपूर्ण बॉलीवूडकर थिरकले होते. तसेच तिच्या लाइव्ह परफॉर्मन्सला सगळ्यांनीच दाद दिली. पण तिचा परफॉर्मन्स झाल्यानंतर रिहाना तातडीने अमेरिकेला परतली. तिच्या परतण्याने अनेकांना प्रश्न पडले होते. आता रिहानाने तिच्या परतण्याचे कारण सांगितले आहे. 

म्हणून रिहाना अमेरिकेला लगेचच परतली

रिहानाने 1 मार्च रोजी झालेल्या  कॉकटेल पार्टीत तिचा लाईव्ह परफॉर्मन्स दिला होता. तिच्या त्या परफॉर्मन्सवर संपूर्ण अंबानी कुटुंबही थिरकले होते. पण हा फरफॉर्मन्स झाल्यानंतर रिहानाने तात्काळ भारताचा निरोप घेतला. याचदरम्यान सोशल मीडियावर रिहानाचा एक व्हिडिओ समोर आलाय.  या व्हिडिओमध्ये रिहाना तिची मैत्रिण मेलिसा फोर्डसोबत कारमध्ये बसून लाईव्ह करताना दिसत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या व्हिडिओमध्ये रिहाना तिच्या मित्राशी बोलताना दिसत आहे. या दरम्यान ती तिच्या मैत्रिणीला विचारते - हे खरंच लाइव्ह आहे का? यानंतर रिहाना म्हणताना ऐकू येते - मी भारतात चांगला वेळ घालवला आहे. माझ्याकडे फक्त दोन दिवस होते. माझ्या भारतातून लवकर निघण्याचे कारण माझी मुले होती. त्यामुळे मला भारतातून परत यावे लागले.

View this post on Instagram
 
A post shared by @badgalriri (@rihannafety)

रिहानाने 'या' गाण्यांवर लाईव्ह  दिला परफॉर्मन्स

रिहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये डायमंड्स, व्हेअर हॅव यू बीन, रुड बॉय आणि पोर इट अप सारखी हिट गाणी गायली आणि सादर केली. अंबानी कुटुंबापासून ते बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनी रिहानाच्या परफॉर्मन्सचा खूप आनंद घेतल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता रिहानाच्या लगेचच परतण्याचं कारणही समोर आलं आहे. 

ही बातमी वाचा : 

Deepika Padukone Dance : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये प्रेग्नंट दीपिका पादुकोणचा धमाकेदार डान्स; शाहरुखने दिल्या 'जय श्रीराम'च्या घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्तMVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कारManoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड आला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड आला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Embed widget