![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
SSR Death Anniversary : 'दररोज तुझी आठवण येते'; रिया चक्रवर्तीकडून सुशांत सिंह राजपूतसोबतचे खास फोटो शेअर
रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काही खास फोटो शेअर केले आहेत.
![SSR Death Anniversary : 'दररोज तुझी आठवण येते'; रिया चक्रवर्तीकडून सुशांत सिंह राजपूतसोबतचे खास फोटो शेअर Rhea Chakraborty Shares Post On Sushant Singh Rajput Death Anniversary Miss You Everyday SSR Death Anniversary : 'दररोज तुझी आठवण येते'; रिया चक्रवर्तीकडून सुशांत सिंह राजपूतसोबतचे खास फोटो शेअर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/14/48ed6faca3524e0cb311ff0585b3b93c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SSR Death Anniversary : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) आज स्मृतिदिन आहे. त्याच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुशांतसोतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुशांत आणि तिचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.
रियाची पोस्ट
रियानं सुशांतसोबतचे काही खास फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, ' दररोज तुझ्या आठवणी दाटून येतात...' रियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. पोस्टला कमेंट करुन अनेकांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
छोट्या पडद्यावरील ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेमध्ये सुशांतनं प्रीत जुनेजा ही भूमिका साकारली. या मालिकेनंतर सुशांतला ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेमुळे सुशांतला विशेष लोकप्रियता मिळाली. केदारनाथ, छिछोरे, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा, पीके,शुद्ध देसी रोमान्स,काय पो चे यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये सुशांतनं प्रमुख भूमिका साकारली. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.
हेही वाचा:
- Sushant Singh : अभिनयासाठी सोडलं शिक्षण; इंजिनिअर ते अभिनेता, सुशांत सिंह राजपूतचा जीवनप्रवास
- Sushant Singh Rajput Net Worth : लक्झरी लाईफ जगत होता सुशांत सिंह राजपूत; सोबत होता अलिशान गाड्यांचा ताफा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)