एक्स्प्लोर

Revati Lele Wedding: नांदा सौख्यभरे..मराठमोळी अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत! रेवती लेलेचा नवरा कोण? 'हॅलो हसबंड' कमेंट चर्चेत

होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा तिनं गुलदस्त्यात ठेवला होता. आज लग्न झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना लग्न झाल्याचं कळवलं.

Revati Lele wedding: गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाकारच्या लग्न सोहळ्यांची सध्या एकच चर्चा आहे. अनेक कलाकारांच्या घरी सनई चौघडे वाजत आहेत. अनेकांची लग्नापूर्वीचे समारंभ, फाेटोशूट सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून लग्नाची बेडी फेम अभिनेत्री रेवती लेले हिच्या लग्नाची एकच चर्चा आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातील या सुप्रसिद्ध खलनायिका लग्नबंधनात अडकली होती. रेवतीनं पुण्यात कौशिक भिडेसोबत लग्नगाठ बांधलीय. दोघांनीही पारंपरिक वेशात आपल्या आयुष्याला नवी सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वीच रेवतीने सोशल मीडियावर हातातली अंगठी दाखवत प्रेमात पडल्याचं चाहत्यांना सांगितलं होत. होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा तिनं गुलदस्त्यात ठेवला होता. आज लग्न झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना लग्न झाल्याचं कळवलं.

कोण आहे रेवती लेलेचा नवरा?

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्रीच्या आयुष्यातील या नव्या सुरुवातीकडे चाहत्यांचे लक्ष आहे. रेवतीनं आपल्या हातातील साखरपुड्याची अंगठी दाखवत लग्न ठरल्याचं सांगितलं होतं. नंतर सोशल मीडियावर तिच्या लग्नविधींचेही फोटो चाहत्यांनी पाहिले. मात्र, रेवतीचा नवरा कोण? याचं कुतूहल चाहत्यांना होतं. कारण तिने नवऱ्याचा चेहरा गुलदस्त्यात ठेवलेला. आता लग्नानंतर रेवती आणि तिच्या नवऱ्याने एकत्रित पोस्ट करत लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. रेवतीच्या नवऱ्याचं नाव कौशिक भिडे असं आहे. त्यानं लग्नाचा फोटो शेअर करत हे यू असं कॅप्शन लिहिलं आहे. त्यावर रेवतीनं 'हॅलो हसबंड' अशी कमेंट केलीय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तर त्याच्या सोशल मीडियावर असलेल्या व्हिडिओ वरून असं लक्षात येतंय की कौशिक भिडे हा ब्रँड मार्केटिंग क्षेत्रातील आहे. अनेक वेगवेगळ्या ब्रँड्सचं मार्केटिंग तो करतो.

पारंपरिक पोशाखात रेवती कौशिक अडकले लग्नबंधनात

रेवती लेले आणि तिचा नवरा कौशिक भिडे या दोघांनी पुण्यात लग्नगाठ बांधली. यावेळी दोघांनीही पारंपरिक मराठमोठा पोशाख परिधान केला होता. रेवतीनं पिवळ्या रंगाची सुंदर साडी, नाकात नथ, हातात चुडा असा पारंपरिक लूक केलेला. तर कौशिकने लाल आणि पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोशाख घातलेला.दोघेही त्यांच्या लग्नाच्या वेशात फार सुंदर दिसत होते.

दरम्यान, लग्न झाल्यानंतर रेवतीच्या या आनंदात मराठी कलाकारही सहभागी झाले. रेवतीला चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नांदा सौख्यभरे म्हणत या जोडीला चाहत्यांसह सिनेकलाकारांनी आशीर्वाद दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget