एक्स्प्लोर

Renuka Shahane On Laxmikant Berde: '...म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेनं लेकाचं नाव 'अभिनय' ठेवलं'; रेणुका शहाणेंनी सांगितला 'तो' किस्सा

Renuka Shahane On Laxmikant Berde: आगामी सिनेमा 'उत्तर'मध्ये एकत्र झळकणार आहेत. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना रेणुका शहाणे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्या अनुभवांबद्दल नुकत्याच काही आठवणी शेअर केल्या आहेत.

Renuka Shahane On Laxmikant Berde: हिंदी सिनेसृष्टीत (Hindi Film Industry) आपल्या साध्याभोळ्या चेहऱ्यानं प्रेक्षकांना आपलंसं करणारं नाव म्हणजे, रेणुका शहाणे (Renuka Shahane). आजवर त्यांनी अनेक सिनेमे (Movies) केले. सलमान खान (Salman Khan) आणि माधुरी दीक्षितसोबतच्या (Madhuri Dixit) 'हम आपके है कौन'मधली (Hum Aapke Hain Koun..!) रेणुका शहाणे यांची भूमिका खूप गाजली. आता लवकरच कित्येक वर्षांनी रेणुका शहाणे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आगामी सिनेमा 'उत्तर'मध्ये एकत्र झळकणार आहेत. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना रेणुका शहाणे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्या अनुभवांबद्दल नुकत्याच काही आठवणी शेअर केल्या आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्यासोबत धाकट्या बहिणीसारखे वागायचे आणि कठीण प्रसंगी त्यांना धीर द्यायचे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंनी लेकाचं नाव अभिनय का ठेवलं? याचा एक भन्नाट किस्साही सांगितला. 

रेणुका शहाणे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा किस्सा सांगताना काय म्हणाल्या? 

रेणुका शहाणेंनी 'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत एक खास किस्सा सांगितला. लक्ष्याला जेव्हा मुलगा झाला, तेव्हा लक्ष्यानं त्याचं नाव अभिनय ठेवलं. लक्ष्यानं ही गोष्ट रेणुका शहाणेंना सांगितली. रेणुका शहाणेंनी लक्ष्यानं ठेवलेल्या नावाचं कौतुक केलं. पुढे लक्ष्यानं हे नाव ठेवण्यामागचं कारण रेणुका यांना सांगितलं. लक्ष्या म्हणाला की, "सगळे म्हणतील, लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे..."

View this post on Instagram
 
A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

रेणुका शहाणेंनी पुढे बोलताना सांगितलं की, "कुठेतरी कॉमेडी करता करता कलाकाराला तेवढा सन्मान मिळत नाही. दुर्दैव आहे हे... कारण कलाकार म्हणून कॉमेडी करणं खूप कठीण आहे. पण जे ड्रामाटिक कलाकार असतात त्यांच्याबद्दल एक वलय असतं की, उत्तम कलाकार आहेत वगैरे... लक्ष्यानं इमोशनल भूमिका सुद्धा खूप अप्रतिम केल्या आहेत. पण त्याला वाव मिळाला नाही. त्यामुळे त्याला कुठेतरी वाटलं की, लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे, मस्त आहे..."  

दरम्यान, रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'उत्तर' या अत्यंत संवेदनशील विषयावरील चित्रपटात  रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत आहेत, तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत आहे. ऋता दुर्गुळेची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक घराची, नि घरातल्या प्रत्येक मुलांची, तरीही आई- मुलाच्या लडिवाळ नात्याची ही आगळीवेगळी गोष्ट नेमकी आहे तरी काय? याचं 'उत्तर' रसिकांना येत्या 12 डिसेंबरला रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ashok Saraf On Marathi Hindi Film Industry: ...म्हणून मला आणि लक्ष्मीकांतला हिंदीत फक्त नोकराच्याच भूमिका मिळाल्या; अशोक सराफ यांनी आढेवेढे न घेता थेटच सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Embed widget