एक्स्प्लोर

Rekha Onscreen Son Sharman Joshi Struggle Life Story: रेखा यांचा ऑनस्क्रीन मुलगा, बॉलिवूडच्या खुंखार व्हिलनचा जावई; पण, आजवर देऊ शकला नाही एकही सोलो हिट, ओळखलं का कोण?

Rekha Onscreen Son Sharman Joshi Struggle Life Story: मल्टिस्टारर सिनेमांमध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली, सिनेमेही यशस्वी ठरले, पण सुपरस्टार म्हणून यश मात्र त्यांच्या वाट्याला फारसं आलेलं नाही.

Rekha Onscreen Son Sharman Joshi Struggle Life Story: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अनेकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात, त्यापैकी बरेच कलाकार असे आहेत, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, अनेकदा त्यांना एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये मर्यादित करून ठेवण्यात आलंय. मल्टिस्टारर सिनेमांमध्ये (Multistarrer Films) त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली, सिनेमेही यशस्वी ठरले, पण सुपरस्टार म्हणून यश मात्र त्यांच्या वाट्याला फारसं आलेलं नाही. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलतोय, त्याचं नाव 'शरमन जोशी' (Sharman Joshi). याचाही समावेश अशाच कलाकारांमध्ये होतो, ज्यांच्या अभिनयाचं कौतुक तर फार होतं, पण अजून त्यांनी एकही सोलो हिट दिलेली नाही. उत्कृष्ट कॉमिक टायमिंगमुळे शर्मन जोशीला सतत विनोदी भूमिका मिळू लागल्या होत्या. मात्र, स्वतःला एका ठरावीक प्रतिमेत अडकवून ठेवणं शरमनला मान्य नव्हतं.

शरमन जोशी (Actor Sharman Joshi) याचा जन्म 28 एप्रिल 1979 रोजी नागपूर इथे झाला. त्याचं कुटुंब अभिनय आणि नाट्यविश्वाशी घट्ट जोडलेलं होतं. त्याचे वडील अरविंद जोशी हे गुजराती रंगभूमीवरील नामवंत अभिनेते होते. घरात कलात्मक आणि अभिनयाचं वातावरण असल्यानं शरमनलाही लहानपणापासून अभिनयाकडे ओढ निर्माण झाली. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यानं दीर्घकाळ रंगभूमीवर काम केलं, अभिनयातील बारकावे आत्मसात केले आणि याच अनुभवाचा त्याला त्याच्या पुढच्या कारकिर्दीत मोठा फायदा झाला. 

शरमन जोशीचा पहिला सिनेमा कोणता? (Sharman Joshi First Movie)

शरमन जोशीनं 1999 मध्ये फिल्म 'गॉडमदर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2001 मध्ये तो 'लज्जा' सिनेमात रेखा यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसला. मात्र, त्याला खरी ओळख त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'स्टाईल' सिनेमामुळे मिळाली. हा सिनेमा विशेषतः तरुण प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला. त्यानंतर त्यानं 'एक्सक्यूज मी' आणि 'शादी नंबर 1' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. या सिनेमांमधील त्याच्या विनोदी अभिनयशैलीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळू लागली.

2006 हे वर्ष शरमन जोशीच्या कारकिर्दीसाठी टर्निंग पॉइंट ठरलं. याच वर्षी तो 'रंग दे बसंती' आणि 'गोलमाल: फन अनलिमिटेड' या सुपरहिट सिनेमांमध्ये झळकला. दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, मल्टिस्टारर सिनेमांमध्ये शरमन याची उपस्थिती प्रेक्षकांना नेहमीच भावली आणि त्यानं अशा सिनेमांमधून अनेक हिट्स दिल्या. विशेषतः 'गोलमाल'मधील त्यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharman Joshi (@sharmanjoshi)

यानंतर शरमन जोशीचं नशीब फळफळलं, अचूक कॉमिक टायमिंग साधणाऱ्या या अभिनेत्याला सिनेसृष्टीत सातत्यानं विनोदी भूमिका मिळू लागल्या. मात्र, लोक आपल्याकडे केवळ विनोदी अभिनेता म्हणून पाहू लागल्याची जाणीव झाल्यानंतर त्यानं आपली वाट बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानी स्वतःला फक्त कॉमेडीपुरतं मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका स्वीकारल्या. 'लाइफ इन ए... मेट्रो'मध्ये त्यानं साकारलेली भूमिका अनेकांना आवडली, तर 'फरारी की सवारी'मध्ये मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका सामान्य वडिलांची व्यक्तिरेखा त्यानं प्रभावीपणे उभी केली. या भूमिकेसाठी त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं गेलं.

याशिवाय, '3 इडियट्स'मधील 'राजू रस्तोगी' ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या सिनेमानं यशाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि शरमन जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा आयफा पुरस्कार मिळवून दिला. सिनेमांबरोबरच त्यानी ओटीटी विश्वातही यशस्वी पाऊल ठेवलं. 'बारिश' या वेब सीरिजमधील त्याच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं तर, शरमन जोशीनं ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांची कन्या प्रेरणा चोप्रा हिच्याशी विवाह केला आहे. त्यामुळेच तो बॉलिवूडमधील खुंखार व्हिलन प्रेम चोप्रा यांचा जावई आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actress Anu Aggarwal Struggle Life: फक्त तीनच महिन्यांत फळफळलं नशीब, 90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget