Red Light : 'सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा!', राजेश्वरीचा नवा अंदाज, 'रेडलाईट' सिनेमाचं पोस्टर लॉन्च
Red Light Marathi Film Poster : राजेश्वरीच्या रेडलाईट या चित्रपटाचं पोस्टर जारी करण्यात आलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्टर टाकलं आहे. हे पोस्टर टाकताना राजेश्वरीनं एक मेसेज देखील दिला आहे.

Red Light Marathi Film Poster : दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी मोक्कार गाजली. हा सिनेमा आल्यानंतर शालू म्हणजेच राजेश्वरी खरातच्या अभिनयाची स्तुती झाली. आता हीच राजेश्वरी एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेश्वरीच्या रेडलाईट या चित्रपटाचं पोस्टर जारी करण्यात आलं आहे. राजेश्वरीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्टर पोस्ट केलं आहे. हे पोस्टर टाकताना राजेश्वरीनं एक मेसेज देखील दिला आहे. 'सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा, पण माझे अश्रू तू विकत घेऊ शकतोस का? बनते एक स्त्री वेश्या, पण खरच स्वईच्छेने का ?प्रश्न हा सोडवून बघ समाजा,कळेल मग व्यथा वेश्येच्या मागच्या स्त्री ची तुला!' असा एक संदेश राजेश्वरीनं टाकला आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन अनमोल मुनगंटीवार यांनी केलं आहे तर निलेश नगरकर यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी मोक्कार गाजली. ही साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.
In Pics: 'शालू'चा हॉट अंदाज, राजेश्वरी खरातचे 'हे' फोटो पाहून चाहते म्हणाले, जाळ अन् धूर संगटच!
'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे. राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत. तिचे सोशल माध्यमावर लाखो फॉलोअर्स आहेत. ती चाहत्यांना अनेकदा आपल्या बेधडक शैलीत उत्तरं देखील देते.























