
Rashmika Mandanna: 'पैसे दिले असते तर...'; लहान मुलांना मदत न केल्यानं नॅशनल क्रश रश्मिका ट्रोल
Rashmika Mandanna : रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Rashmika Mandanna : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नुकताच तिचा 'पुष्पा- द राइज' (Pushpa : The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं ऑफिसवर धुमाकूळ घालतला. मात्र सध्या रश्मिका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओला कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.
व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की रश्मिका एका हॉटेलमधून बाहेर येते. तिथे असणारे फोटोग्राफर्स रश्मिकाचे फोटो काढत असतात. तेवढ्यात तिथे काही लहान मुलं येतात. एक मुलगी रश्मिकाच्या जवळ येते आणि म्हणते की, 'दीदी मला जेवण करायचं आहे, थोडे पैसे देशील का?'. त्यानंतर बाकी लहान मुलं देखील रश्मिकासोबत बोलतात. पण रश्मिका त्या मुलांची मदत करत नाही आणि गाडीमध्ये बसून निघून जाते. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत रश्मिकाला ट्रोल केले आहे. 'पैसे किंवा काही तरी खायला दिले असते तर काय झाले असते?' अशी कमेंट एका नेटकऱ्यांनी केली. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, 'त्या मुलांबद्दल वाईट वाटत आहे शंभर रूपये तरी ही देऊच शकते. एवढे पैसे कमावते त्याचा काय उपयोग?'
View this post on Instagram
लवकरच रश्मिका ही 'गुडबाय' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
रश्मिका आणि अल्लू अर्जुन नाही तर यांना दिली होती 'पुष्पा'ची ऑफर; सहा सेलिब्रिटींनी दिला नकार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
