तुमच्या शुभेच्छा स्वीकारते... देवरकोंडाशी साखरपुड्याच्या खबरांमध्ये रश्मिकाला शुभेच्छा देताच लाजून लालेलाल झाली, व्हिडिओ व्हायरल
रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी ‘थामा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 21 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, रश्मिका सध्या त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

Rashmika Mandanna: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna Vijay Devarkonda) यांची जोडी पडद्यावर आणि पडद्याबाहेरही चाहत्यांना खूप आवडते. लोकांना नेहमीच त्यांना एकत्र पाहायचे असते. बऱ्याच काळापासून त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरत आहेत. दरम्यान, त्यांच्या साखरपुड्याच्या खबरा येत असल्यानं हे जोडी पुन्हा चर्चेत आलीय. दरम्यान एका प्रमोशनदरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी होस्टने रश्मिकाला शुभेच्छा दिल्या. हे ऐकून ती लाजली आणि हसत म्हणाली, “मी तुमच्या शुभेच्छा स्वीकारते.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी ‘थामा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 21 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, रश्मिका सध्या त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिच्या आणि साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या खाबरा पसरल्या होत्या.
विजयसोबत साखरपुडा झाला का? रश्मिका म्हणाली..
‘गलाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत रश्मिकाला होस्टने शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला ती थोडी चकित झाली आणि नंतर हसत लाजली. होस्टने लगेच स्पष्ट केलं की तो तिला तिच्या नवीन परफ्यूम लाइनसाठी शुभेच्छा देत आहे. यावर रश्मिका म्हणाली, “अरे नाही नाही, पण आजकाल खूप काही घडतंय, त्यामुळे मी सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारते.” तिची ही प्रतिक्रिया सध्या जोरदार वायरल होतेय. देवरकोंडाचा उल्लेख झाला नसला तरी तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि तिचं उत्तर ऐकून चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये धुमाकूळ घातलाय.
View this post on Instagram
एका चाहत्याने लिहिले, "तिची रिएक्शन पहा,किती कमाल आहे, यार," तर दुसऱ्याने टिप्पणी केली, "गोंडस." काही लोकांनी तिची खिल्लीही उडवली, एकाने लिहिले, "रश्मिका मंदान्ना, जेव्हा संपूर्ण जगाला माहिती आहे तेव्हा तू हे का लपवत आहेस..."
विजय आणि रश्मिकाची ऑनस्क्रीन जोडी
रश्मिका आणि विजयने एकत्र पहिल्यांदा 2018 मध्ये आलेल्या ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर दोघे ‘डिअर कॉमरेड’मध्येही दिसले. दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली. त्या काळात त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. अलीकडे विजयच्या हातात अंगठी दिसल्याने आणि रश्मिकानेही डायमंड रिंगसह व्हिडिओ शेअर केल्याने साखरपुड्याच्या अफवा पुन्हा जोरात सुरु झाल्या.
‘थामा’मध्ये आयुष्मान आणि नवाजुद्दीनसोबत
रश्मिका मंदाना आता ‘थामा’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. यात ती आयुष्मान खुराना यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असून नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या आठवड्यात प्रेक्षकांसाठी धमाल ठरणार आहे.


















