Ranvir Shorey: मुलगा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर गोव्यात रणवीर शौरीसोबत गैरवर्तणूक
Ranvir Shorey: बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी आणि त्याचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. स्वत: रणवीर शौरीनं याबाबत माहिती दिलीय. मात्र, ही माहिती शेअर केल्यानंतर रणवीर शौरी अडचणीत सापडलाय.

Ranvir Shorey: बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी आणि त्याचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. स्वत: रणवीर शौरीनं याबाबत माहिती दिलीय. मात्र, ही माहिती शेअर केल्यानंतर रणवीर शौरी अडचणीत सापडलाय. रणवीर आपल्या मुलासोबत गोव्याला सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्यांनी आपल्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये तो थांबला होता, तेथील लोकांनी त्याच्यासोबत गैरवर्तणूक केल्याचं त्यानं ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय.
रणवीर शौरीनं त्याच्या ट्विटर हँडलवरून त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितलाय. मी लोकांच्या भल्यासाठी सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. पण ज्या हॉटेलमध्ये आम्ही क्वारंटाईन आहोत, तेथील लोकांनी या पोस्टमुळं आम्हाला खोलीबाहेर घेरले. इतर लोकांनी आम्हाला हॉटेलमधून बाहेर काढण्यासाठी हॉटेल मालकांवर दबाव टाकला. समाजात कसा भेदभाव केला जातो आणि लोकांचे दुहेरी चारित्र्य तिथे दिसले. ज्यांना पूर्वी आमच्यासोबत सेल्फी घ्यायचे होते ते आता हॉटेलवाल्यांना सवलत आणि परत मागू लागले. कारण मी तिथे होतो. हा अनुभव माझ्या कायम लक्षात राहील. मला प्रश्न पडतो की या जगाला खरंच प्रामाणिकपणाची गरज आहे का? असा प्रश्नही रणवीर शौरनं विचारला आहे.
रणवीर शौरी यांचं ट्वीट-
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा कला क्षेत्राला मोठा फटका बसलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित न होता. ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. बऱ्याच दिवसानंतर सिनेमागृह सुरु करण्यात आली. परंतु, पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ लागलीय. ज्यामुळं पुन्हा सिनेमागृहांना टाळे लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Anushka Sharma Comeback : अनुष्का शर्मा बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार; अधिकृत घोषणा लवकरच
Vijay Galani : चित्रपट निर्माते विजय गलानी यांचं निधन; सूर्यवंशी, वीर यांसारख्या चित्रपटांची केली होती निर्मीती
https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/vijay-galani-dies-of-blood-cancer-in-london-hospital-1021916























