(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Alia Bhatt : सोन्या-चांदीची जरी अन् तयार करायला लागले तब्बल 3000 तास; आलियाचा भरजरीत मेहंदीचा लेहंगा
Alia Bhatt : मेहंदीच्या कार्यक्रमाला आलियानं घतलेल्या लेहंग्याची देखील सोशल मीडियवर चर्चा सुरू आहे.
Alia Bhatt : बॉलिवूडमधील क्यूट कपल अशी ओळख असलेल्या आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या आऊट-फिटनं अनेकांचे लक्ष वेधलं पण लग्नाआधी झालेल्या मेहंदीच्या कार्यक्रमाला आलियानं घतलेल्या लेहंग्याची देखील सोशल मीडियवर चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात या लेहंग्याबाबत खास गोष्टी...
रिपोर्टनुसार, आलियाचा मेहंदीच्या कार्यक्रमातील लेहेंगा हा तयार करण्यासाठी 3000 तास म्हणजेच जवळपास पाच महिने लागले. मेहंदीसाठी आलियानं परिधान केलेला हा लेहंगा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या कलेक्शनमधील होता. हा लेहंगा काश्मिरी आणि चिकनधारी धाग्याने विणलेले आहे. मिजवान वेलफेअर सोसायटीच्या महिलांनी त्यावर नक्षीकाम केले आहे. यात बनारसी ब्रोकेड, जॅकवर्ड, बांधणी आणि रॉ-सिल्क नॉट्सचा समावेश आहे. तसेच या लेहंग्याच्या ब्लाऊजवर सोन्या-चांदीची जरी आहे.
View this post on Instagram
आलियाचा हा लेहंगा डिझाइन केलेल्या डिझायनरनं म्हणजेच मनीष मल्होत्रानं आलियाला शुभेच्छा दिल्या. आलियाचा फोटो शेअर करून त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आलियाला आम्ही शुभेच्छा देतो. तिनं मेहंदीच्या कार्यक्रमासाठी आमचा फ्यूशिया पिंक ड्रेस परिधान केला होता. या आऊट-फिमध्ये 180 पॅच लावण्यात आले आहेत. '
हे देखील वाचा-
- Thar Trailer : अनिल कपूर आणि हर्षवर्धनच्या 'Thar' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 'या' तारखेला चित्रपट नेटफ्लिक्सवर झळकणार
- India’s Got Talent 9 Winner: लाखो रूपये, लग्झरी कार अन् ट्रॉफी ; इंडियाज गॉट टॅलेंटची विजेती जोडी दिव्यांश आणि मनुराजवर बक्षीसांचा पाऊस
- The Archies : शाहरूखची लेक सुहाना अन् जान्हवीची बहीण खुशी कपूरसोबत झळकणार ‘बिग बीं’चा नातू अगस्त्य! चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात