एक्स्प्लोर

Marathi Actress Sushma Jaywant On Marathi Language: '...मराठी माणूस आहे ना! त्याला तुम्ही पहिली सक्ती करा...'; 'कमळी' फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत, मराठीच्या मुद्द्यावर थेट म्हणाली...

Marathi Actress Sushma Jaywant On Marathi Language: झी मराठीवरच्या गाजणाऱ्या 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री सुषमा जयवंत हिनं रिक्षाचालकांना मराठी भाषा सक्तीच्या वादावर आपलं मत परखडपणे मांडलं आहे.

Marathi Actress Sushma Jaywant On Marathi Language: महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) 1 मे 2026 (महाराष्ट्र दिन) पासून राज्यातील सर्व ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 'व्यवहारिक मराठी' अनिवार्य (Marathi Language Mandatory For Auto-Rickshaw And Taxi Drivers) केली आहे. या निर्णयानुसार, चालकांना मराठी (Marathi Language) वाचता, बोलता आणि समजता येणं गरजेचंच आहे. ज्यांना मराठी येत नाही, त्यांचे परवाने (Permits) रद्द करण्याची किंवा नूतनीकरण न करण्याची चेतावणी परिवहन विभागानं दिली असून, या निर्णयाला चालक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता हा मुद्दा केवळ मराठी भाषा अनिवार्य करण्याचा राहिलेला नाही. यावरुन आता केवळ महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण जगभरात राजकीय वाद तीव्र झाला आहे. 

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना (Auto-Rickshaw And Taxi Drivers) आता मराठी भाषेत बोलावं लागेल, मराठी बोलता, लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (State Transport Minister Pratap Sarnaik) यांनी दिला आहे. त्यामुळे मराठी भाषा सक्तीची या राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात 4 मे पासून मुंबईतील 15 लाख रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यावरुन हे सर्व प्रकरण तापलं आहे. या प्रकरणावर वेगवेगळ्या स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीनं या मुद्द्यावर आपलं स्पष्ट आणि परखड मत मांडलं आहे. अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टा हँडलवर शेअर केलेला व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

झी मराठीवरील (Zee Marathi) गाजत असलेल्या 'कमळी' (Kamali Marathi Serial) मालिकेतील सुषमा जयवंत (Sushma Jaywant) या मराठमोळ्या अभिनेत्रीनं रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य (Marathi Language Mandatory) करण्याच्या निर्णयावर आपलं मत मांडलंय. भैय्या जेव्हा भाजी विकत असतो किंवा तो एखादा रिक्षावाल्याला 'तुम यहां पे आओगे क्या? ये भाजी कितने मे दी?' हे बोलणारा मराठी माणूस आहे ना! त्याला तुम्ही पहिली सक्ती करा, असं अभिनेत्रीनं ठामपणे सांगितलंय. तसेच, आपण मराठी बोलायची लाज बाळगतो आणि आपण इतरांना सांगतो की मराठी बोला, असंही अभिनेत्रीनं म्हटलंय. 

मराठी अभिनेत्री सुषमा जयवंत नेमकं काय म्हणाली? 

मराठी अभिनेत्री सुषमा जयवंतनं इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला असून त्या व्हिडीओमध्ये ती म्हणालीय की, "नमस्कार मी सुषमा जयवंत... एक मुद्दा मी आता बघितला. तुम्ही यूपीवाल्यांना जर मराठी येत नसेल, तर गाडी चालवून देणार नाही. मान्य आहे... खूप छान, पण जेव्हा ते परवाना घ्यायला येतात, तेव्हा सरकारकडून किंवा त्यांना जो परवाना मिळतो, तो दिलाच का जातो? तेव्हा का कुणी सक्ती करत नाही? दुसरा प्रश्न, भैय्या जेव्हा भाजी विकत असतो किंवा तो एखादा रिक्षावाल्याला 'तुम यहां पे आओगे क्या? ये भाजी कितने मे दी?' हे बोलणारा मराठी माणूस आहे ना! त्याला तुम्ही पहिली सक्ती करा..." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sushma Jaywant (@sushmajaywant)

"तुम्ही स्वत: पहिल्यांदा मराठीत बोला... आपण मराठी बोलायची लाज बाळगतो आणि आपण इतरांना सांगतो की मराठी बोला... काय लॉजिक आहे? तुम्ही आपल्या मुलांना किती मराठी माध्यमात शिकायला पाठवत आहात? भाषेचं बंधन असणं, नसणं मला कळत नाही... पण हे जे काही 'तू गलत है, तू गलत है' चाललंय… त्यात तू पण चुकीचाच आहेस. याच्याबद्दल विचार करा आणि याच्याबद्दल नक्की मत मांडा... मला नक्कीच चर्चा करायला आवडेल…", असं अभिनेत्री सुषमा जयवंत हिनं शेवटी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Utkarsh Shinde On Marathi Langauge Compulsion: 'मराठीच कळत नाही किंवा कळून घ्याचीच नाही, म्हटल्यावर...'; अमराठी रिक्षा चालकांना मराठमोळ्या गायकाचा थेट इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut pn Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
OTT Thriller Movie: 2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget