(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ramayana Release Date: ठरलं! दोन भागांत होणार प्रदर्शित, रामायण मोठ्या पडद्यावर कधी रिलीज होणार? निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट
Ramayana Release Date: रणबीर कपूरच्या रामायण सिनेमाच्या तारखांविषयी एक मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे.
Ramayana: नितेश तिवारीचा (Nitesh Tiwari) 'रामायण' (Ramayana) हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या घोषणेची वाट पाहत आहेत. अखेरिस प्रेक्षकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून रणबीर कपूर-यश-साई पल्लवी हे कलाकार असलेला रामायण या सिनेमांच्या तारखांविषयी अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
रामायणाच्या रिलीजविषयी निर्मात्यांकडून ही मोठी अपडेट देण्यात आली आहे. नुकतच या सिनेमाचं एक पोस्टर नितेश तिवारीने शेअर केलंय. हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. पहिला भाग हा 2026 मध्ये आणि 2027 मध्ये दुसरा भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर पोस्टर शेअर
एक दशकाहून अधिक काळपासून मी मी 5000 वर्षांहून अधिक काळ कोट्यवधींच्या मनावर राज्य राज्य करणाऱ्या या महाकाव्याला मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला. आज हा प्रयत्न आकार घेताना पाहून मला खूप आनंद होतोय. आपला इतिहास, आपली संस्कृती प्रतिबिंबित करणारे “रामायण” लोकांसमोर आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हे महान महाकाव्य अभिमानाने आणि आदराने जिवंत करण्याचे स्वप्न पूर्ण करुया... रामायणचा पहिला भाग 2026 मध्ये आणि दुसरा भाग 2027 मध्ये येणार आहे.
पोस्टरमध्ये चित्रपटातील कलाकारांचा उल्लेख नाही
मात्र, पोस्टर किंवा पोस्टमध्ये चित्रपटाच्या कलाकारांचा उल्लेख नाही. पोस्टरमध्ये फक्त रिलीजचे वर्ष आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव आहे. मात्र, याआधी रामायणाच्या सेटवरील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या एका फोटोमध्ये रणबीर कपूर आणि सई पल्लवी हे राम आणि सीतेच्या भूमिकेत दिसत आहेत. दरम्यान, यशने आपण रावणाची भूमिका साकारत असल्याचीही माहिती दिली आहे. तसेच अरुण गोविल आणि लारा दत्तही या सिनेमात दिसणार आहेत. अरुण गोविल हे राजा दशरथ आणि राणी कैकयीची भूमिका साकारणार आहेत.
View this post on Instagram