एक्स्प्लोर

Mahesh Babu, Ram Gopal Varma : 'हिंदीमध्ये चित्रपट डब करुन पैसे कमावतात', महेश बाबूच्या वक्तव्यावर राम गोपाल वर्माची प्रतिक्रिया!

महेश बाबूच्या (Mahesh Babu) वक्तव्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) प्रतिक्रिया दिली आहे. 

Mahesh Babu, Ram Gopal Varma : गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू (Mahesh Babu) हा त्यानं केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. यावेळी महेश बाबूनं बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबाबत सांगितलं होतं. 'बॉलिवूडला मी परवडत नाही', असं तो म्हणाला होता. आता त्याच्या या वक्तव्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) प्रतिक्रिया दिली आहे. 

हिंदीमध्ये डब केलेला चित्रपट रिलीज करुन पैसे कमावतात
राम गोपाल वर्मानं  बॉलिवूडबाबत महेश बाबूनं केलेल्या वक्तव्याला प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला, 'हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. पण मला तो जे म्हणालाय ते कळालच नाही. तो म्हणाला की, बॉलिवूड त्याला अफोर्ड करु शकणार नाही पण, यामधून तो नक्की काय म्हणू इच्छितो. मला कळालच नाही. जर तुम्ही साऊथचे चित्रपट पाहिले तर ते हिंदीमध्ये डब केले जातात. आणि त्यामधून हे लोक पैसे कमावतात.'

पुढे राम गोपाल वर्मा म्हणाला, 'बॉलिवूड ही कोणतीही कंपनी नाही. हे नाव मीडियाद्वारे देण्यात आलं आहे. एखादे विशिष्ट चित्रपट किंवा प्रॉडक्शन हाऊस तुम्हाला एका फीमध्ये चित्रपट ऑफर करते, परंतु यासाठी तुम्ही संपूर्ण बॉलिवूडचे नाव कसे घेऊ शकता? त्यामुळे महेश बाबूचं नक्की काय मत आहे हे मला  कळालेलं नाही. '

मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमामध्ये महेश बाबूनं बॉलिवूडबाबत वक्तव्य केलं होतं. 'मला बॉलिवूडमधून खूप ऑफर्स आल्या. बॉलिवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही. तेलगू चित्रपटांमुळेच मला स्टारडम आणि लोकांचं प्रेम मिळालं. ' पुढे महेश बाबू म्हणाला होता, 'माझा उद्देश  पॅन इंडिया स्टार व्हायचा नाहीये. मला दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरात यश मिळवून द्यायचंय. मला आधी पासूनच तेलगू चित्रपटांमध्ये काम करायचे होते आणि माझी इच्छा होती की भारतातील सर्व लोकांनी हे चित्रपट बघावेत. 

1983 साली 'पोरातम' या चित्रपटातून बाल भूमिकेच्या माध्यमातून महेश बाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 1999 साली 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

The Odyssey Box Office Collection: 'द ओडिसी'नं बॉक्स ऑफिस नमवलं; अवघ्या 9 दिवसांत सगळ्यांनीच हात टेकले, आतापर्यंत किती कमावले?
'द ओडिसी'नं बॉक्स ऑफिस नमवलं; अवघ्या 9 दिवसांत सगळ्यांनीच हात टेकले, आतापर्यंत किती कमावले?
Bollywood TV Actress Shagufta Ali: 'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं
'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं
South Actress On CJP Protest:'माझ्या मुलांना अभिजीत दिपकेसारखं बनवायला आवडेल' लोकप्रिय अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली..
'माझ्या मुलांना अभिजीत दिपकेसारखं बनवायला आवडेल' लोकप्रिय अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली..
Jana Nayagan Box Office Collection: सेंसॉरच्या कात्रीत अडकला, 7 महिने रखडला; विजय थलपतींच्या 'जननायगन' ने बॉक्स ऑफिस पछाडलं; थक्क करणारं कलेक्शन
सेंसॉरच्या कात्रीत अडकला, 7 महिने रखडला; विजय थलपतींच्या 'जननायगन' ने बॉक्स ऑफिस पछाडलं; थक्क करणारं कलेक्शन

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget