एक्स्प्लोर

Singer Salim Kodathur: मित्राच्या सल्ल्याने वापरली फेअरनेस क्रीम, प्रसिद्ध गायकाच्या किडनीवर झाला गंभीर परिणाम; नेमकं काय घडलं?

Salim Kodathur fairness Cream: फेअरनेस क्रीम ठरली आरोग्यासाठी घातक? प्रसिद्ध गायकाने सांगितला धक्कादायक अनुभव.

Salim Kodathur fairness Cream problem: गायक आणि संगीतकार सलीम कोड़ाथूर (Salim Kodathur) यांनी रविवारी मोठा खुलासा केला. त्याने केलेला खुलासा ऐकून अनेकांना धक्का बसला. 10 वर्षांपूर्वी मित्राच्या सल्ल्यानुसार, फेअरनेस वाढवणारी क्रिम (Fairness cream) वापरल्यानंतर त्याला गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. काही महिन्यांतच त्याच्या पापण्या आणि पाय सुजले होते. त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली होती. PTIच्या रिपोर्टनुसार, सलीमने  पत्रकारांना सांगितले होते की, डॉक्टरांच्या तपासणीत गायकाची ही स्थिती एल्ब्यूमिनची (एक महत्वपूर्ण प्रोटीन) पातळी कमी असल्यामुळे झाल्याचे निदान झाले आहे.  डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, प्रोटीनची पातळी कमीच राहिली तर किडनी निकामी होऊ शकते.

फेअरनेस क्रीम ठरली गायकाच्या आरोग्यासाठी घातक (Salim Kodathur Reveals Serious Health Complications after use of cream)

गायकाने सांगितले की,  किडनी बायोप्सीनंतर त्याला 'मेम्ब्रेनस नेफ्रोपैथी' (membranous nephropathy) असल्याचं निदान झाले. या आजाराच्या उपचारासाठी  गायक बरीच महिने रुग्णालयात होता.  सलीमने सांगितले की, त्याने ही क्रिम 500 रुपयांत विकत घेतली होती.   एक वर्षाहून अधिक काळ त्याने ही क्रिम वापरली होती.  आरोग्याच्या निगडीत समस्या अजूनही त्याला छळत आहे. विशेषत: झोपेच्या समस्या अजूनही सतावत आहे.  गायक म्हणाला की, 'मी दिवसातून केवळ 2 ते 3 तास झोपू शकतो.  काही दिवसानंतर मला झोपेसाठी गोळ्या घ्यावे लागल्या', असा खुलासा  सलीम कोड़ाथूर  याने केला.

मिळालेल्या माहितीनुसार,  फेअरनेस क्रिम वापरणाऱ्या का 17 वर्षीय तरुणीलाही अशीच समस्या जाणवली होती. मलप्पुरम येथील एस्टर MIMS मदर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या मते, 'त्या तरुणीने इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सचे प्रमोशनल व्हिडिओ पाहून क्रिम मागवली होती. तसेच ती क्रिम वापरली होती.  यात दावा करण्यात आला होता की, ही क्रिम मुरुमे,  काळे डाग आणि पिगमेंटेशन काढून टाकेल'.  यानंतर त्या तरुणीला गंभीर आजाराच्या संबंधित समस्या जाणवू लागल्या. तिचा अचानक ब्लड प्रेशर अचानक कमी झाला.  तसेच तिचे पायही सुजले होते. 

गायक सलीमनेही सांगितले की,  त्याला देखील अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला होता. यामुळे गायक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर झाला होता.  यामुळे त्याला आपले कार्यक्रम पुढे ढकलावे लागले. परिणामी त्याचे प्रचंड नुकसान झाले होते. माहितीनुसार, त्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, वापरलेल्या क्रिमचा नमुनाही तिने पोलिसांना दिला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Gujarati Woman On Aadi Anant: 'मी गुजराती आहे, पण मराठी माणसंच...', 'आदी अनंत' सिनेमा बघायला गेलेल्या गुजराती तरुणीची नाराजी

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak: प्रसाद ओक नव्या भूमिकेत झळकणार; हिंदी सिनेमात एन्ट्री, चित्रपटाचं नाव काय? कधी रिलीज होणार?
प्रसाद ओक नव्या भूमिकेत झळकणार; हिंदी सिनेमात एन्ट्री, चित्रपटाचं नाव काय? कधी रिलीज होणार?
Sanket Pathak: '...चपलेने मारायची वेळ आलीये'; राजकीय व्यक्तीचा उल्लेख करत मराठी अभिनेता भडकला, म्हणाला, 'याचा गेम आता मी...
'...चपलेने मारायची वेळ आलीये'; राजकीय व्यक्तीचा उल्लेख करत मराठी अभिनेता भडकला, म्हणाला, 'याचा गेम आता मी...
Gujarati Woman On Aadi Anant: 'मी गुजराती आहे, पण मराठी माणसंच...', 'आदी अनंत' सिनेमा बघायला गेलेल्या गुजराती तरुणीची नाराजी
'मी गुजराती आहे, पण मराठी माणसंच...', 'आदी अनंत' सिनेमा बघायला गेलेल्या गुजराती तरुणीची नाराजी
Salman Khan: 'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
Advertisement

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sensex Nifty Stock Market : सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी, दुसरीकडे सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले, ट्रम्प कनेक्शन समोर
सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, शेअर बाजारात पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचं नुकसान, 6 लाख कोटी बुडाले
Trisha Krishnan : मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
लातूरमध्ये 21 वर्षीय आरोपीला काल अटक, आज पोलीस कोठडीतच संपवलं जीवन; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप
लातूरमध्ये 21 वर्षीय आरोपीला काल अटक, आज पोलीस कोठडीतच संपवलं जीवन; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप
Raigad Crime: रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
EPFO : पीएफ खात्यातील पैसे UPI द्वारे कधीपासून काढता येणार? EPFO ची 3.0 प्रणाली कधी पासून सुरु होणार? नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे UPI द्वारे कधीपासून काढता येणार? EPFO ची 3.0 प्रणाली कधी पासून सुरु होणार?
Jalgaon Crime News : जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
Embed widget