एक्स्प्लोर

Big Director Supports Ranveer Singh on FWICE Ban: 'रणवीरला नव्हे FWICE लाच बॅन करा' मोठा दिग्दर्शक रणवीर सिंहच्या मागे उभारला; 'डॉन 3' प्रकरणात काय तोडगा निघणार?

रणवीरवर झालेल्या कारवाईवर त्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून चित्रपटसृष्टीतील एका बड्या दिग्दर्शकानं रणवीर सिंहला नाही तर FWICEलाच बॅन करायला हवं असं म्हणत रणवीरला पाठिंबा दिलाय. 

Big Director Supports Ranveer Singh on FWICE Ban: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood News) 'डॉन 3' प्रकरणावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. सिनेमाचं शुटिंग सुरू होण्याच्या तोंडावर मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या रणवीर सिंहनं (Ranveer Singh) सिनेमातून माघार घेतली. त्यामुळे दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) यांच्यात वाद उफाळला. रणवीरनं तडकाफडकी सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानं निर्मात्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला गेला. रणवीरनं नुकसान भरपाई देण्यासही नकार दिला. याच पार्श्वभूमीवर FWICE कडून त्याच्यावर कारवाई करत त्याला कोणीही त्यांच्या चित्रपटात घेऊ नये असं म्हणत बॅन केलं. रणवीर वर झालेल्या कारवाईवर त्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून चित्रपटसृष्टीतील एका बड्या दिग्दर्शकानं रणवीर सिंहला नाही तर FWICEलाच बॅन करायला हवं असं म्हणत रणवीरला पाठिंबा दिलाय. 

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी अभिनेता रणवीर सिंहवर लावण्यात आलेल्या FWICE च्या बंदीवर जोरदार टीका केली आहे. बॉलिवूड स्टार्समुळे लाखो सिने कामगारांना रोजगार मिळतो, उद्योग संघटनांमुळे नाही, असे म्हणत त्यांनी FWICEला फटकारले.

FWICE ने सोमवारी रणवीर सिंहविरोधात असहकाराचा आदेश जारी केला होता. फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

राम गोपाल वर्मा यांची x पोस्ट

राम गोपाल वर्मा यांनी शनिवारी त्यांच्या X हँडलवर पोस्ट शेअर करत रणवीरची बाजू घेतली. “FWICE वर बंदी घाला, रणवीर सिंहवर नाही. ही तथाकथित बंदी अखेरीस FWICE साठीच मोठा विनोद ठरेल. ते कामगारांचे किंवा इंडस्ट्रीचे संरक्षण करत असल्याचा दावा करत असले, तरी हा फक्त जुनाट युनियन सिस्टीमच्या शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी लिहिले.

ते पुढे म्हणाले, “FWICE हे ना न्यायालय आहे ना सरकारमान्य नियामक संस्था. उलट ती एका ‘कांगारू कोर्ट’सारखी वागत आहे, जी न्याय देण्याचा दिखावा करते पण कायदेशीर प्रक्रिया आणि निष्पक्षतेकडे दुर्लक्ष करते. रणवीरसारखे स्टार्सच लाखो कामगारांना रोजगार देतात. रणवीरसारखे कलाकार नसते, तर इंडस्ट्री आणि FWICE दोन्ही अस्तित्वातच नसते.” FWICE ने अद्याप राम गोपाल वर्मा यांच्या या पोस्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

रणवीर सिंह बॅन प्रकरण नेमके काय?

दरम्यान, फरहान अख्तर आणि त्यांचे भागीदार रितेश सिधवानी यांनी रणवीर सिंहविरोधात इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण FWICE कडे पाठवण्यात आले. ‘डॉन 3’ या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरूही झाले नव्हते. मात्र निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, प्री-प्रोडक्शनवर 45 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला होता.

FWICE च्या माहितीनुसार, रणवीर सिंहला अनेक नोटिसा पाठवण्यात आल्या, पण त्याने कोणतेही उत्तर दिले नाही.‘डॉन 2’ नंतर फरहान अख्तर दिग्दर्शनात पुनरागमन करणार होते. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या मूळ ‘डॉन’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि झीनत अमान मुख्य भूमिकेत होते. तर ‘डॉन 2’ मध्ये शाहरुख खान झळकला होता. मिळालेल्या माहितीनुसार, स्क्रिप्टमधील बदलांमुळे रणवीर सिंहने ‘डॉन 3’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यांचा आरोप आहे की, ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या यशानंतर रणवीरने ‘डॉन 3’ वारंवार पुढे ढकलला आणि अखेर डिसेंबर 2025मध्ये चित्रपट सोडला.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Nandurbar: आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; नंदुरबारच्या वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
Embed widget