Rakhi Sawant Ex Husband :राखी सावंतच्या Ex Husband ने गुपचूप उरकलं लग्न? सलमान खानच्या जवळील 'या' व्यक्तीशी बांधली लग्नगाठ
Rakhi Sawant Ex Husband Marriage : राखी सावतंचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान याने गुपचूप लग्न उरकलं असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
Rakhi Sawant Ex Husband Marriage : आदिल खान (Adil Khan) हा राखी सावंतमुळे बराच चर्चेत आला होता. अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्यासोबत आदिलने लग्न केलं होतं. पण काही काळापूर्वी राखीने आदिलवर बरेच आरोप केले. त्यानंतर पुन्हा एकदा आदिल लग्नबंधनात अडकला असल्याचं सांगण्यात येत आहे. आदिलने ज्या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधली आहे, ती व्यक्ती बॉलीवूडचा भाईजान सलमानच्या (Salman Khan) जवळील असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिलने बिग बॉस 12 ची स्पर्धक सोमी खान (Somi Khan) हिच्याशी लग्नगाठ बांधली असल्याचं सांगण्यात येत आहे.
ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आदिल खानने 2 मार्च रोजी जयपूरमध्ये सोमीसोबत लग्न केलं आहे. या दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत अद्याप कोणताही खुलासा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण राखीने केलेल्या आरोपांमुळे आदिल मागील काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. त्यामुळे या दोघांनीही आपल्या लग्नासंदर्भात तुर्तास तरी कोणत्याही प्रकारचा खुलासा करणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
कोण आहे सोमी खान?
सोमी खान आणि सबा खान 'बिग बॉस 12' मध्ये स्पर्धक म्हणून दिसले होते. या दोघी बहिणी असून त्या मूळच्या जयपूरच्या आहे. करिअरच्या निमित्ताने सोमी सध्या मुंबईत स्थायिक आहे. तसेच सोमी खानने 'न्याय: द जस्टिस', 'केसरिया बालम' आणि 'हमारा हिंदुस्तान' सारखे शो केले आहेत. दरम्यान सोमी आणि आदिल हे एकमेकांना कसे भेटले, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. पण सोमी आणि सबासोबत आदिल अनेक पार्टींज् मध्ये दिसला होता.
आदिलविरोधात होऊ शकते अजामीनपात्र वॉरंट जारी
आदिल खानची ऑगस्ट 2023 मध्ये 6 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका झाली. सुटका होताच त्याने राखीवर 200 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आणि गंभीर आरोपही केले. त्यानंतर आदिलचा जामीन रद्द करण्यासाठी राखी सावंतने अंधेरी कोर्टात याचिका दाखल केली होती. आदिल खानला उत्तर दाखल करण्याची शेवटची संधी देण्यात आली होती. बुधवार, 6 मार्च रोजी, अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आणि जर आदिल अद्यापही हजर झाला नाही किंवा त्याचा जबाब नोंदविण्यात अयशस्वी झाला तर त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाईल.