तृतीयपंथीयांवर हृतिक रोशनचे वडील भडकले; VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
Rakesh roshan gets angry at Transgender: रोशन कुटुंबात नव्या सुनेचे आगमन झाले. यावेळी काही ट्रान्सजेंडर देखील आले. तृतीयपंथीयांवर राकेश रोशन भडकले.

Rakesh roshan gets angry at Transgender: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान रोशनने नुकतीच लग्नगाठ बांधली. ईशान आणि ऐश्वर्या सिंह यांचा मुबंईत 23 डिसेंबर रोजी विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्न समारंभाचे फोटो इंटरनेटवर सर्वत्र व्हायरल होत आहे. दरम्यान, लग्न समारंभानंतर थोडा गोंधळ निर्माण झाला होता. लग्नानंतर नवविवाहित जोडपे घरी निघाले होते. बसमधून उतरताच त्यांना काही ट्रान्सजेंडरने अडवले. यावेळी राकेश रोशन ट्रान्सजेंडरवर भडकले. ट्रान्सजेंडर आणि राकेश रोशन यांच्यात काहीवेळ बाचाबाची झाली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
ईशान रोशन हे बॉलिवूड संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांचा मुलगा आहे. राजेश रोशन आणि राकेश रोशन हे नात्याने भाऊ आहेत. ईशानने नुकतंच ऐश्वर्या सिंहशी लग्नगाठ बांधली. या लग्न समारंभात संपूर्ण रोशन फॅमिली उपस्थित होती. केवळ हृतिकच नाही तर त्याचे 2 लहान मुले आणि प्रेयसी सबा आझाद देखील उपस्थित होती. लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
लग्न समारंभ झाल्यानंतर रोशन कुटुंब घरी जाण्यासाठी रवाना झाले. रोशन कुटुंब घरी पोहोचल्यावर, ट्रान्सजेंडर लोकांनी त्यांना गेटवर अडवले. तसेच अभिनंदन करण्यास सुरूवात केली. यावेळी राकेश रोशन ट्रान्सजेंडरवर भडकले. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये राकेश रोशन एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत बोलताना दिसत आहे. राकेश रोशन यांच्या एक्सप्रेशनवरून ते भडकलेले दिसत आहेत. या व्हिडिओत वर ईशान तसेच राजेश रोशन देखील दिसत आहे.
दुसर्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये, ऐश्वर्या सिंह लेहेंगा घातलेली दिसत आहे. बसमधून उतरताच ऐश्वर्या घराच्या दिशेनं जाण्यासाठी निघते. परंतु, ट्रान्सजेंडर व्यक्ती तिला थांबवतात. तसेच तिची नजर काढतात. नंतर राकेश रोशन आणि ऐश्वर्या रोशन एकत्र फोटो काढतात. याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या दोन्ही व्हिडिओंवर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने, "ते कोट्यवधी कमवतात, म्हणून त्यांनी १० लाखांची मागणी केली असावी", तर आणखी एका नेटकऱ्याने, "ही लोक अभिनंदन करण्यासाठी नाही तर, खंडणीसाठी आले आहेत", अशी प्रतिक्रिया दिली आहे.
#HrithikRoshan's Father Rakesh Roshan Appeared Upset as Kinners Arrived To Seek Blessings During a Family Wedding Celebration 😱 pic.twitter.com/dSJQ7OEMzX
— Filmy_Duniya (@FMovie82325) December 23, 2025
महत्त्वाच्या इतर बातम्या:
पुष्पाच्या बिग हिटनंतर अल्लू अर्जून पुन्हा करणार धमाका; 1000 कोटींचा चित्रपट काढणार, नाव काय?
"माझा काजू किती गोड", बाळाला कडेवर घेताच भारती सिंह झाली भावुक; आईपणाची भावना जागी























