Rajiv Kapoor Death : बॉलीवूड अभिनेते राजीव कपूर यांचे निधन
बॉलीवूड अभिनेता, निर्माता राजीव कपूर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले आहे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता, निर्माता राजीव कपूर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबईत त्यांच्या राहत्या घरी दुपारी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना चेंबूर येथील रुग्णालयात त्यांना नेण्यात आले पण तेथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत राजीव कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
राजीव कपूर अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक होते. राजीव कपूर यांनी 'एक जान हैं हम' या चित्रपटातून 1983 साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात ते मुख्य भूमीकेत दिसून आले होते. या शिवाय त्यांनी आसमान (1984), लवर बॉय (1985), जबरदस्त (1985) और हम तो चले परदेस (1988) चित्रपटात काम केले आहे. राजीव कपूर यांनी आ अब लौट चलें (1999), प्रेमग्रंथ (1996) और Henna (1991) या चित्रपटाचे निर्माते होते. प्रेमग्रंथ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.