Rajinikanth On Election : सध्या निवडणुकीचा काळ आहे, श्वास सोडायलाही...; रजनीकांत यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Rajinikanth On Election : रजनीकांत बुधवारी चेन्नईतील एका रुग्णालयाच्या नवीन शाखेच्या उद्घाटनासाठी आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी यावेळी भाषण केले.
Rajinikanth On Election : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यातील काहीजण यशस्वी झाले. तर, काहीजणांनी राजकीय पटलावरील इनिंग यशस्वी झाली नाही. राजकारणात प्रवेश करणार असल्याची इच्छा व्यक्त करूनही माघार घेतलेले सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी थट्टा-मस्करीत सेलिब्रिटींना एक सल्लाच दिला आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
रजनीकांत बुधवारी चेन्नईतील एका रुग्णालयाच्या नवीन शाखेच्या उद्घाटनासाठी आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी यावेळी भाषण केले. या रुग्णालयात आपल्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याचे आठवण त्यांनी सांगितली. हे सांगताना रजनीकांत यांनी थट्टा-मस्करीच्या वातावरणात निवडणुकीवरही भाष्य केले. रजनीकांत यांनी म्हटले की, देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे आणि अशा परिस्थितीत तोंड उघडायलाही घाबरत आहे.
कमल हसन यांची घेतली फिरकी
आपल्या भाषणात रजनीकांत यांनी अभिनेता कमल हसन यांचीदेखील फिरकी घेतली. रजनीकांत यांनी म्हटले की, आधी विचारले जायचे की कावेरी रुग्णालया कुठे आहे? त्यावेळी लोक कमल हसनच्या घराशेजारी रुग्णालय असल्याचे सांगायचे. आता कमल हसनचे घर कुठं आहे असे विचारतात तर, सांगतात कावेरी रुग्णालयाच्या शेजारी आहे. रजनीकांत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचीदेखील फिरकी घेतली. त्यांनी म्हटले की, या ठिकाणी मीडियाचेही प्रतिनिधी आहेत. मी थट्टा-मस्करीत वक्तव्य केले. आता उद्या असे लिहू नका की रजनीकांत यांनी कमल हसनसोबत पंगा घेतला.
मला बोलण्यासाठी भीती वाटते
Thalaivar speech at Kauvery Hospital inauguration today! pic.twitter.com/SdTJpsyz6K
— Kars (@Kars0211) March 20, 2024
रजनीकांत पुढे म्हणाले, 'खरं तर मला इथे अजिबात बोलायचे नव्हते, पण मला काही शब्द बोलायला सांगितले गेले. या कार्यक्रमात मीडिया हाऊसचे लोकही असतील का, असे मी त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की काही लोक असतील. पण आता हे सगळे कॅमेरे समोर बघून भीती वाटते. ही देखील निवडणुकीची वेळ आहे. मला श्वास सोडायलाही भीती वाटत असल्याचे त्यांनी हसतहसत सांगितले.