'अर्थाचा अनर्थ...' विनोदी मीमच्या बॅकग्राऊंडला"अ जी मंगल भवन" ऐकून भजनगायकाची धमाल प्रतिक्रिया व्हायरल, म्हणाले..
त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आता पुन्हा एकदा समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसतेय. यावर नेटकऱ्यांनी गुरुजींनी दिलेल्या प्रतिक्रियेचं कौतूक होत आहे.

O Ji Mangal Bhavan Singer Reaction: इंस्टाग्राम स्क्रोल करताना कधी अचानक 'अ जी मंगल भवन अमंगल हारी' हे भजन कुठल्यातरी मीमच्या मागे साउंड म्हणून ऐकू आलंय? विनोदी रिल्समागे बॅकग्राऊंड ट्रॅक म्हणून लागलेलं हे भजन असंख्य मीममागे तुफान व्हायरल झालं. क्रियेटर्सपासून ते सामान्य स्क्रोलर्सपर्यंत सर्वजण हे भजन विनोदी क्लिपसोबत जोडून वापरत आहेत. ज्या भक्तीभावानं हे भजन झालं त्याचा डिजिटल जगात मात्र एकदम वेगळाच अर्थ आता तयार झालाय. देशभरात लोकप्रीय झालेला मीम मागचा तो आवाज रामकथा सांगणाऱ्या राजन तिवारी यांचाय. अलिकडेच एका कार्यक्रमात त्यांनी हे भजन म्हणताना या मीम्सचा उल्लेख करत मिश्किलपणे भाष्य केलंय. "मंगल भवन अमंगल ऐकलं की आता खरंच रडू येतं .. अर्थाचा अनर्थ करून टाकलाय" असं म्हणालेत. पण हे सगळं सांगताना इतक्या खेळकरपणे त्यांनी सांगितले की त्यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झालीय.
मंगल भवन इस्टावर बघून आता खरंच रडू येतंय ..
अचानक मिळालेल्या मीम फेमवर प्रतिक्रिया देताना रामकथा गायक राजन तिवारी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रतिक्रिया दिलीय. या गाण्याच्या गंभीर अध्यात्मिक रूपाचं मीममध्ये झालेलं रूपांतर होताना पाहून हे गाणं ऐकलं की आता खरंच रडू येतंय .. अर्थाचा अनर्थ करून टाकलाय. एकानं मला दाखवलं ' एक गेट बंद आहे . चार पोरं त्याला लाय मारत उघडायचा प्रयत्न करतायत. पाहिला जातो एक लाथ मारतो .. दुसरा जातो मारतो एक लाथ .. तिसरा जातो , मारतो लाथ... चौथा लाथ मारायला जातो तेवढ्यात गेट उघडतो अन् तो दार तोडून आत पडतो ... तो जसा वार तोडून घराच्या आत जातो तसं मागे वाजतं ' ओ जी मंगल भवन अमंगल .. " असं गाऊन दाखवतात. या नव्या लोकप्रियतेकडे त्यांनी सकारात्मकतेने पाहण्याचाच प्रयत्न केलाय. त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आता पुन्हा एकदा समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसतेय. यावर नेटकऱ्यांनी गुरुजींनी दिलेल्या प्रतिक्रियेचं कौतूक होत आहे. अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्यात.
View this post on Instagram
























