एक्स्प्लोर

Raja SHivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी'च्या गर्जनेनं सह्याद्री दणाणला; विजयध्वज उंचावला, हिंदीपेक्षा मराठीतून सर्वाधिक कमाई; बजेट वसुल केलं की नाही?

ओपनिंग डेलाच तब्बल 11.35 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम निर्माण करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला.

Raja Shivaji Box Office Collection: महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या भव्य ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं असून बॉक्स ऑफिसच्या रणांगणातही (Box Office Collection) विजयध्वज दिमाखात फडकवला आहे. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांची फौज असूनही या चित्रपटाला सर्वाधिक प्रेम मराठी प्रेक्षकांकडून मिळालं. हिंदीपेक्षा मराठी आवृत्तीमधूनच ‘राजा शिवाजी’ने मोठी कमाई करत मराठी सिनेसृष्टीसाठी नवा इतिहास रचला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवसापासून इतिहास रचण्यास सुरुवात केली. ओपनिंग डेलाच तब्बल 11.35 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम निर्माण करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला.

चित्रपटाचे नेट कलेक्शन किती?

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि प्रमुख भूमिकेत असलेल्या या ऐतिहासिक चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 33.9 कोटी रुपयांची धडाकेबाज कमाई केली होती. मराठी सिनेमांसाठी अशक्य मानली जाणारी आकड्यांची मर्यादा ‘राजा शिवाजी’ने सहज ओलांडत आता दुसऱ्या आठवड्यातही आपला विजयध्वज फडकवला आहे. देशभरातून या चित्रपटाचे नेट कलेक्शन आता 73.15 कोटी रुपयांवर पोहोचले असून ग्रॉस कमाई 86.65 कोटींवर गेली आहे.

हिंदीपेक्षा मराठी आवृत्तीची सरशी

विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची मांदियाळी असतानाही या चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद मराठी प्रेक्षकांकडून मिळाला आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान यांसारख्या हिंदी कलाकारांसोबत महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जेनेलिया आणि रितेश देशमुख अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

तरीही ‘राजा शिवाजी’च्या मराठी आवृत्तीने हिंदी आवृत्तीपेक्षा मोठी मुसंडी मारली आहे. 12व्या दिवसापर्यंत चित्रपटाने मराठी आवृत्तीतून 51.75 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं, तर हिंदी आवृत्तीची कमाई 21.40 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 

‘सैराट’च्या विक्रमावर नजर

मराठी चित्रपटसृष्टीत आजही ‘सैराट’चा दबदबा कायम असला, तरी कमी बजेटमध्ये बनलेल्या त्या चित्रपटाने 90 कोटींचा टप्पा गाठला होता. आता जवळपास 100 कोटींच्या बजेटमध्ये साकारलेल्या ‘राजा शिवाजी’ने अवघ्या दोन आठवड्यांतच त्या विक्रमाच्या दिशेने झेप घेतली आहे. मनोरंजनविश्वात सध्या एकच चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget