एक्स्प्लोर

पॉर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्रांची अटक केवळ दिखावा अटक बेकायदेशीर, राज कुंद्रांच्यावतीनं हायकोर्टात आरोप

कोरोनाकाळात गरज नसताना उगाच आरोपींना अटक करून जेलमधील गर्दी वाढवू नका' असे सर्वोच्च न्यायालयाचे सध्या अटेकबद्दल निर्देश स्पष्ट असतानाही मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.

मुंबई : पॉर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्रावर मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई हा केवळ दिखावा आहे, असा आरोप कुंद्रा यांच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं केलेली ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत राज कुंद्रा आणि त्यांचा सहाकारी रायन थॉर्प यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यापुढे सुनावणी झाली. शनिवारी याप्रकरणी राज्य सरकार आपली बाजू मांडेल. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्याशिवाय कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असं स्पष्ट करत हायकोर्टानं राज कुंद्रा यांना कोणताही तातडीचा दिलासा तूर्तास दिलेला नाही.

मुंबई पोलिसांना या तपासात सहकार्य करूनही पोलिसांनी बेकायदेशीरपणे आपल्याला अटक केल्याचा प्रमुख दावा राज कुंद्रा यांनी या याचिकेतून केला आहे. सीआरपीसी कलम 41(a) नुसार दिलेल्या नोटीसवर सही करण्यास नकार दिल्यानं तपासात सहकार्य करण्यास नकार दिल्याचा ठपका पोलिसांकडनं राज कुंद्रांवर ठेवण्यात आलाय. पण हीच नोटीस स्विकारलेल्या रायन थॉर्प या त्यांच्या सहका-यालाही पोलिसांनी अटक केलीच. मुळात ही नोटीस सांगते की आरोपीला तपास यंत्रणेसमोर हजर होण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी द्यायला हवा, मात्र इथं तो अवधी दिलेलाच नाही. मुळात याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेलं असताना पोलिसांनी ही नोटीस दिल्यानंतर कोर्टाला कळवणंही अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. तसेच अश्या प्रकारची कारवाई कोणावर केली जाते? जे सराईत गुन्हेगार असतील, जे सहकार्य करत नसतील किंवा जे आक्रमक होत असतील त्यांच्यावर मात्र राज कुंद्रा हे यापैकी कुठल्याही प्रकारात मोडत नाहीत, मग अटकेची कारवाई का?, असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला.

'कोरोनाकाळात गरज नसताना उगाच आरोपींना अटक करून जेलमधील गर्दी वाढवू नका' असे सर्वोच्च न्यायालयाचे सध्या अटेकबद्दल निर्देश स्पष्ट असतानाही मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. कारण त्यांना केवळ कारवाई केल्याचा दिखावा करायचा आहे. आम्हाला समाधान आहे की, हायकोर्ट किमान या गोष्टींची पडताळणी करतंय, मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं आमचं ऐकूनच घेतलं नाही. आरोपीला थेट रिमांड मंजूर केली, याच विरोधात आम्ही दाद मागत आहोत असा युक्तिवाद राज कुंद्राचे वकील आभात पोंडा यांनी हायकोर्टात केला.

तसेच रायन थॉर्प हा राज कुंद्रांच्या कंपनीत काम करणारा निव्वळ एक आय.टी. कर्मचारी आहे. मात्र त्याच्यावर 'हॉट शॉट्स' या अॅपची देखरेख करत असल्याचा आरोप आहे. तसेच याप्रकरणी फेब्रुवारी 2021 मध्ये पुरावे नष्ट केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आलाय. तसेच कलम 41(a) ची नोटीस स्वीकारल्यानंतरही त्याला अटक करण्यात आली जे बेकायदेशीर आहे. असा दावा थॉर्प याच्या वकिलांनी हायकोर्टात केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Torres Scam Mumbai | मुंबईतील टोरेस फसवणुकीमागचे मास्टरमाईंड कोण? Special ReportMadhya Pradesh Love Crime | प्रेयसीची हत्या, दहा महिन्यांनी फ्रिजमध्ये आढळला मृतदेह Special ReportBhau Torsekar Majha Katta | भाजप हरेल तेव्हा मोदींचं काय? मोदी भक्त भाऊ तोरसेकर 'माझा कट्टा'वरJob Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget