Raid 2 First Review: 'मास्टरपीस, ब्लॉकबस्टर...', अजय देवगणच्या 'रेड 2'चा फर्स्ट रिव्यू समोर, 'छावा'ला पछाडणार?
Raid 2 First Review: अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित 'रेड 2' चित्रपटाचे दोन रिव्यू समोर आले आहेत. या दोन्ही रिव्यूमध्ये चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.

Raid 2 First Review: 2025 वर्ष बॉलिवूडसाठी (Bollywood) तसं चांगलं ठरलं. 2024 मध्ये फक्त रि-रिलीजच्या भरोवशावर चाललेल्या बॉलिवूडनं 2025 मध्य मात्र उत्तम सुरुवात केली. 'छावा'नं (Chhaava Movie) बॉलिवूड गाजवलं. त्यानंतर आलेल्या सिनेमांनी 'छावा' एवढं कलेक्शन (Chhaava Box Office Collection) केलेलं नाही. पण, बॉलिवूडचं नाक वाचवलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण, अशातच आता आज 1 मे पासून बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचं वादळ येण्याची शक्यता आहे. सनी देओलचा 'जाट' (Jaat), अक्षय कुमारच्या 'केसरी 2'चं (Kesari 2) वादळ शमलेलं नाही आणि अजय देवगण त्याच्या 'रेड 2' सिनेमातून खळबळ माजवणार आहे.
2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'रेड' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. 'रेड'नं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. अशातच आता चित्रपटाचे सुरुवातीचे पुनरावलोकन आले आहेत आणि ते वाचल्यानंतर असे दिसते की हा चित्रपट देखील तेच चमत्कार करणार आहे.
आज 1 मे रोजी 'रेड 2' प्रदर्शित होणार आहे. पण यादरम्यान दोन दिग्गजांनी परदेशात 'रेड 2' चित्रपट पाहिला आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तर मग Raid 2 च्या पहिल्या रिव्यूमध्ये चित्रपटाबद्दल काय म्हटलंय, जाणून घेऊयात...
भरत जे मेहरा म्हणाले, मास्टरपीस
प्रसिद्ध ज्योतिषी आणि उद्योगपती भरत जे मेहरा यांनी दुबईमध्ये एका विशेष स्क्रिनिंग दरम्यान हा चित्रपट पाहिला. त्यांनी चित्रपटाला 4.5 स्टार दिले आहेत. तसेच, त्यांनी सिनेमाचं पोस्टर त्याच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केलं आणि लिहिलंय की, "अजय देवगण भारीच आहे. रितेश देशमुख ब्रिलियंट आणि सौरभ शुक्ला आऊटस्टँडिंग आहे."
भरतनं या स्टोरीमध्ये अजय देवगणसोबतचा त्याचा फोटोही शेअर केला आहे आणि चित्रपटाचं म्युझिक फायर असल्याचं म्हटलं आहे.
उमर संधू म्हणाले की, पैसा वसूल
दुसरीकडे, उमर संधूनंही एक इंस्टाग्राम पोस्ट पोस्ट करून हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचं म्हटलं आहे. उमर संधू यांनी 27 एप्रिल रोजी लिहिलंय की, आताच 'रेड 2' पाहिला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे.
View this post on Instagram
अजय देवगणचा 'रेड 2' थिएटर गाजवणार असल्याचं बोललं जात आहे. 2025 मध्ये रिलीज झालेल्या बॉलिवूडपटांपैकी 'रेड 2' धमाकेदार कमाई करेल असं म्हटलं जात आहे. अशातच आता 'रेड 2', यापूर्वी तब्बल 800 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या 'छावा'ला मागे टाकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड'चा सिक्वेल 'रेड 2' हा चित्रपट राजकुमार गुप्ता यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अजय देवगण अमय पटनायकच्या भूमिकेत त्याची 75वी रेड करताना दिसणार आहे. रितेश देशमुख, दादा मनोहर भाईंच्या भूमिकेत नेगेटिव्ह शेडमध्ये दिसलाय आणि सौरभ शुक्लाचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. यावेळी वाणी कपूरनं इलियाना डिक्रूझची जागा घेतली आहे 'रेड'मध्ये इलियाना डिक्रूझनं अजय देवगणच्या ऑन स्क्रिन पत्नीची भूमिका साकारली होती. आता 'रेड 2'मध्ये वाणी कपूर दिसली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















