![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pushpa 2 OTT Release: एकदम कन्फर्म; थिएटर गाजवल्यानंतर 'पुष्पा 2'चा जलवा आता OTT वर; कधी आणि कुठे पाहाता येणार?
Pushpa 2 OTT Release: थिएटर गाजवल्यानंतर आता ओटीटी गाजवण्यासाठी 'पुष्पा 2' सज्ज झाला आहे. अशातच या फिल्मच्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
![Pushpa 2 OTT Release: एकदम कन्फर्म; थिएटर गाजवल्यानंतर 'पुष्पा 2'चा जलवा आता OTT वर; कधी आणि कुठे पाहाता येणार? Pushpa 2 The Rule OTT Release wait is over allu arjun and rashmika mandanna Movie will release on netfilx know you watch Pushpa 2 OTT Release: एकदम कन्फर्म; थिएटर गाजवल्यानंतर 'पुष्पा 2'चा जलवा आता OTT वर; कधी आणि कुठे पाहाता येणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/afb6c06feff5d886626b0decf7e84174173440072639688_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pushpa 2: The Rule OTT Release: 'पुष्पा 2: द रूल'नं (Pushpa 2: The Rule) बॉक्स ऑफिसवर (Boc Office) धुमाकूळ घातला आहे. पुष्पाच्या वाईल्ड फायर जलव्यासमोर, बॉक्स ऑफिस पूर्णपणे झुकलं आहे. पुष्पा 2 नं आपल्या दमदार यशानं भारतातील अनेक मोठमोठ्या आणि दिग्गजांच्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा हा चित्रपट छप्पडफाड कमाई करत आहे. पुष्पा 2 नं आतापर्यंत वर्ल्डवाईल्ड 1100 कोटींचा गल्ला जमा केला आहे. अशातच रिलीजच्या 10 दिवसांनीसुद्धा अल्लू अर्जुनचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. थिएटरनंतर आता अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसह बरेच लोक OTT वर पुष्पा 2 च्या रिलीजची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार, अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 पुढील वर्षी 9 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. नेटफ्लिक्सनं कोट्यवधींची डील कन्फर्म करत, पुष्पा 2 चे सर्व हक्क विकत घेतले आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप त्याच्या OTT रिलीजबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सहसा, कोणताही चित्रपट चित्रपटगृहांनंतर OTT वर प्रदर्शित होण्यासाठी 40 ते 50 दिवस लागतात.
View this post on Instagram
अल्लू अर्जुन पुन्हा एकदा सुकुमार दिग्दर्शित पुष्पा 2 मध्ये पुष्पराजच्या भूमिकेत दिसला. प्रत्येकजण त्याच्या अभिनयाचं आणि चित्रपटाच्या कथेचं कौतुक करत आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, पुष्पा 2 मध्ये रश्मिका मंदाना, फहद फासिल, सुनील, राव रमेश आणि जगपती बाबू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सर्व लोकांच्या अभिनयाचं चित्रपटात खूप कौतुक होत आहे. पुष्पा 2 चं बजेट जवळपास 550 कोटी रुपये आहे. अवघ्या 3-4 दिवसांत बजेट वसूल करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)