बॉक्स ऑफिसवरचं 'पुष्पा'राज संपलं? 40 व्या दिवशी कमाईत कमालीची घट; 1 कोटींचा टप्पा गाठताना नाकी नऊ...
Pushpa 2 Box Office Collection Day 40: पुष्पा 2 चं आजचं कलेक्शन पाहता, असं दिसतंय की, आता पुष्पा 2 लवकरच बॉक्स ऑफिसला अलविदा करणार आहे.
Pushpa 2 Box Office Collection Day 40: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2 द रुल' (Pushpa 2 The Rule) या चित्रपटाच्या कमाईत गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत वाढ झाली होती, पण त्यानंतर मात्र, आज बॉक्स ऑफिसवर (Box Office) चित्रपटाच्या कमाईत घट होऊ लागली आहे. या चित्रपटानं 164.25 कोटी रुपयांची शानदार ओपनिंग केली आणि 5 डिसेंबरपासून एकामागून एक असे अनेक विक्रम मोडलेत. दरम्यान, वरुण धवनचा बेबी जॉन आणि हॉलिवूडचा मुफासा यांसारखे मोठे चित्रपटही पुष्पासमोर कमकुवत दिसत होते. पण आज चित्रपट प्रदर्शित होऊन 40 दिवस झाले आहेत, त्यामुळे चित्रपटाची कमाई कमी होणं स्वाभाविक आहे. तर चला तर मग जाणून घेऊया चित्रपटाच्या आतापर्यंतच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल...
पुष्पा 2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
पुष्पा 2 नं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 129.5 कोटी रुपये, चौथ्या आठवड्यात 69.65 कोटी रुपये आणि पाचव्या आठवड्यात 25.25 कोटी रुपयांची शानदार कमाई केली. सहाव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच, 37 व्या दिवशी चित्रपटाने 1.15 कोटी रुपये, 38 व्या दिवशी 2 कोटी रुपये आणि 39 व्या दिवशी 2.4 कोटी रुपये कमावले.
चित्रपटाच्या 40 व्या दिवसाच्या कलेक्शनशी संबंधित सुरुवातीचे आकडेही सॅकनिल्कवर आले आहेत. रात्री 10:45 वाजेपर्यंत चित्रपटाने 1 कोटी रुपये कमावले आहेत. आणि चित्रपटाचा एकूण कलेक्शन 1221.55 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. दरम्यान, हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
40 व्या दिवशी पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर गळपटला
37 व्या दिवशी पुष्पा 2 चं एका दिवसातील सर्वात कमी कलेक्शन होतं. त्या दिवशी चित्रपटानं 1.15 कोटी रुपये कमावले होते. आता चित्रपटाच्या आजच्या कलेक्शनमध्ये आणखी घट झाली आहे.
View this post on Instagram
पुष्पा 2 आजवरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर
पुष्पा 2 हा भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट बनला आहे. या चित्रपटानं बऱ्याच काळापूर्वी प्रभासच्या 2017 मधील बाहुबली 2 या चित्रपटाचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. बाहुबली 2 नं 1030.42 कोटी रुपये कमावले होते. पुष्पा 2 यापेक्षा खूप पुढे गेला आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रमही केला आहे. या चित्रपटानं जवान, पठाण, अॅनिमल, गदर 2 आणि स्त्री 2 सारख्या अनेक हिंदी चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.
पुष्पा 2 ची स्टारकास्ट आणि बजेट
सुकुमार दिग्दर्शित, 2021 च्या सुपरहिट चित्रपट 'पुष्पा द राईज'चा हा सिक्वेल बनवण्यासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च आला आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाचा तिसरा भाग, पुष्पा 3 द रॅम्पेजची घोषणा देखील केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
बॉलिवूडच्या 'या' 6 चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिसवर येणार वादळ; संपुष्टात येईल साऊथ सिनेमांचं वर्चस्व