एक्स्प्लोर

Pushpa 2 Box Office Collection Day 19: पुन्हा रचला इतिहास! बॉलिवूडमध्ये रचला नवा विक्रम, अल्लू अर्जुनच्या सिनेमाने सादर केला 700 कोटींचा क्लब

Pushpa 2 Box Office Collection Day 19: पुष्पा 2 च्या कमाईने शाहरुख-सलमान आणि आमिर खान यांना मागे टाकले आहे.

Pushpa 2 Box Office Collection Day 19: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा 2 (Pushpa 2) सिनेमाने प्रेक्षकांना सध्या चांगलीच भुरळ घातली आहे. चित्रपट सातत्याने नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. सर्वच भाषांमध्ये सिनेमाने दमदार कामगिरी केलीये. हिंदीमध्ये तर सिनेमाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. शाहरुख-सलमान आणि आमिर खानचे चित्रपट आजपर्यंत करू शकले नाहीत, असा रेकॉर्ड पुष्पा 2 ने बनवला आहे. 

कोइमोईच्या अहवालानुसार, पुष्पा 2 ने 700 कोटी क्लबमध्ये प्रवेश केल्याचे सुरुवातीचे ट्रेंड आहेत. अल्लू अर्जुनने 700 कोटींचा क्लब सादर केला आहे. 700 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कलेक्शन केलं. स्त्री 2 ने कमावलेल्या 627 कोटींचा विक्रम मोडून सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला. आता या चित्रपटाने 700 कोटींचा व्यवसाय करून नवा विक्रम केला आहे.

हिंदी भाषेतील 'पुष्पा 2' ची कमाई

हिंदी भाषेत चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 433.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात 199 कोटींचा व्यवसाय केला आणि तिसऱ्या आठवड्यात 60 कोटींची कमाई केली. आता 19व्या दिवशी हा चित्रपट 9-10 कोटींची कमाई करेल आणि यासोबतच 700 कोटींचा आकडा पार करेल  अशी माहिती समोर आलेली आहे. याआधी स्त्री 2 ने 600 कोटी रुपयांचा क्लब सादर केला होता अशी माहिती आहे.पुष्पा 2 चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. 

पुष्पा 2 ने मोडला बाहुबलीचा रेकॉर्ड

पुष्पा 2 सिनेमाने 17 व्या दिवशी 1029.9 कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतातील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत प्रभासचा बाहुबली 2 1030.42 कोटींची कमाई करून पहिल्या क्रमांकावर होता. आता पुष्पा 2 ला फक्त 52 लाखांची कमाई करुन बाहुबलीला मागे टाकायचे होते. आता या सिनेमाने ती कामगिरी केली आहे. यामुळे चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सध्या सिनेमाची स्थिती पाहता हा सिनेमा लवकरच 1100 कोटींचा टप्पा पार करेल.भारतातील पहिला चित्रपट 1913 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून, पुष्पा 2 ने गाठलेला हा आकडा एकही चित्रपट गाठू शकला नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

ही बातमी वाचा : 

Mrunmayee deshpande : 'अवखळ हासरी, अल्लड लाजरी'; भावाच्या लग्नासाठी नटली मृण्मयी देशपांडे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Bhondekar : शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या राजीनामानाट्यानंतर यूटर्नTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24  डिसेंबर 2024 : ABP MajhaMahayuti Government : काही मंत्र्यांना मुख्य इमारतीत तर काहींना विस्तारित इमारतीत दालन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
Embed widget