Pushpa 2 Box Office Collection: 'पुष्पा 2' झुकेगा नहीं... 41व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई, 1250 कोटींचा आकडा पार करणार?
Pushpa 2 Box Office Collection: 'पुष्पा 2' च्या कमाईचा वेग आता मंदावला असला तरी, तो अजूनही एक कोटींपेक्षा जास्त कमाई करत आहे. सहाव्या मंगळवारीही चित्रपटाची कमाई उत्कृष्ट राहिली आहे.

Pushpa 2 Box Office Collection Day 41: पुष्पाची (Pushpa 2 The Rule) जादू रिलीजनंतर 41 दिवसांनीही बॉक्स ऑफिसवर कायम आहे. 'पुष्पा 2' (Pushpa 2) म्हणजेच 'पुष्पा: द रूल' रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर (Box Office) राज्य करत आहे. हा चित्रपट देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत कोटींची कमाई केली आहे. अशातच आता हळूहळू पुष्पा 2च्या कमाईत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही बॉक्स ऑफिसवरची पकड मात्र मजबूत केली आहे. 'पुष्पा 2'नं रिलीजच्या 41व्या दिवशी म्हणजेच, सहाव्या मंगळवारी किती कोटींची कमाई केली? हे सविस्तर पाहुयात...
'पुष्पा 2' नं 41 व्या दिवशी किती कमाई केली?
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2' हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असा चित्रपट बनला आहे, ज्यानं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 'पुष्पा 2' समोर बॉलिवूड किंवा कोणताही साऊथ चित्रपट टिकू शकलेला नाही. या चित्रपटानं सर्वांना चकित केलं आहे आणि नंबर 1 चित्रपटाचा टॅगही मिळवला आहे. 'पुष्पा 2' प्रदर्शित होऊन 41 दिवस झाले आहेत आणि त्यानं कमाईचे विक्रम रचले आहेत. यादरम्यान अनेक चित्रपट आले आणि गेले पण 'पुष्पा 2' चं वादळ कुणीच थांबवू शकलं नाही. 'पुष्पा 2'च्या कमाईचा आलेख आता खूपच खाली आला आहे, तरीही तो अजूनही कोट्यवधींमध्ये कमाई करत आहे.
- चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, 'पुष्पा 2'चा पहिल्या आठवड्याचं कलेक्शन 725.8 कोटी रुपये होतं.
- 'पुष्पा 2' नं दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटींची कमाई केली
- 'पुष्पा 2' नं तिसऱ्या आठवड्यात 129.5 कोटी रुपये कमावले.
- चौथ्या आठवड्यात चित्रपटाचा कलेक्शन 69.65 कोटी रुपये होता.
- 'पुष्पा 2' चा पाचव्या आठवड्यात व्यवसाय 25.25 कोटी रुपये होता.
- चित्रपटाने 37 व्या दिवशी 1.15 कोटी रुपये, 38 व्या दिवशी 2 कोटी रुपये, 39 व्या दिवशी 2.35 कोटी रुपये आणि 40 व्या दिवशी 1 कोटी रुपये कमावले.
- आता 'पुष्पा 2' च्या रिलीजच्या 41 व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे आले आहेत.
- सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' ने रिलीजच्या 41 व्या दिवशी 1.5 कोटींचा व्यवसाय केला आहे.
- यासह, 'पुष्पा 2' ची 41 दिवसांत एकूण कमाई आता 1223 कोटी रुपये झाली आहे.
'पुष्पा 2' 1250 कोटींचा आकडा पार करणार?
'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार परफॉर्मन्स केला आहे. फिल्म रिलीज झाल्यानंतर सहाव्या आठवडे उलटून गेले आहेत. आणि आताही कोट्यवधींची कमाई करत आहे. याचा अंदाज लावता येऊ शकतो की, ही फिल्म रिलीज झाल्यानंतर दीड महिन्यानंतरही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तसेच, थिएटर्समध्ये अजुनही पुष्पा 2 चाच बोलबाला आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग निश्चितच मंदावला आहे, परंतु तो 1250 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल असं दिसतंय. दरम्यान, सातव्या आठवड्याच्या शेवटी 'पुष्पा 2' किती कलेक्शन करू शकतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























