Pushkar Jog Unfollowed Pakistan's Friends: 'पाकिस्तानी लोकांच्या अंगात मस्ती, ती काढायला हवी', पुष्कर जोगचा संताप, पाकिस्तानी मित्रांनाच केलं अनफॉलो
Pushkar Jog Unfollowed Pakistan's Friends: पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारही अॅक्शन मोडमध्ये आलं असून पाकिस्तानला (Pakistan) धडा शिकवण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलली जात आहेत.

Pushkar Jog Unfollowed Pakistan's Friends: कश्मीर (Kashmir News) खोऱ्यातल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) संपूर्ण देश हादरला. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलेलं. तब्बल 28 पर्यटकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला. यानंतर पाकिस्तान आणि भारतातील तणाव पुन्हा वाढल्याचं दिसतंय. पर्यटकांच्या मृत्यूचा बदला हवाय, अशी आर्त हाक देशभरातून केंद्र सरकारला (Central Government) घातली जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारही अॅक्शन मोडमध्ये आलं असून पाकिस्तानला (Pakistan) धडा शिकवण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलली जात आहेत. सिंधू कराराला केंद्र सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. तसेच, पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेशही दिले गेले. अशातच पाकिस्तानी कलाकार आणि त्यांच्या चित्रपटांनाही देशात बंदी घालण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अनेक कलाकारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली, तर अनेकांनी पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतली. अशातच आता यावर मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगनं संताप व्यक्त करत पाकिस्तानी कलाकारांना सुनावलं आहे. तसेच, त्यानं आपल्या काही पाकिस्तानी कलाकारांना अनफॉलोही केलं (Pakistani Artists Were Also Unfollowed.) आहे.
मराठी अभिनेता पुष्कर जोग नेमकं काय म्हणाला?
मराठी अभिनेता पुष्कर जोगनं 'लोकशाही फ्रेंडली'ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं म्हटलं की, "मला असं वाटतं की खूप झालं. पाकिस्तान या देशाचं आपण खूप सहन केलं. खूप ऐकलं. आपलं जे आता सरकार आहे, ते प्रबळ, हुशार आणि दणकट आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला उत्तर देण्याची गरज आहे. कारण खूप वर्षांपासून आपण ऐकतोय, 26/11 चा हल्ला किंवा पुलवामामध्ये झालेला हल्ला, दरवर्षी किंवा वर्षाआड ते चालूच असतं. आता बास झालं."
"ज्यांना पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आहे. जे म्हणतात की हे सगळं वेगळं आहे. हे राजकारण आणि मनोरंजन क्षेत्र एकत्र करू नका. मनोरंजन क्षेत्र वेगळं आहे. का एकत्र करायला नको? इथे येऊन पाकिस्तानमधील गायक, कलाकार हे बॉलीवूडमधून कमावतात. पैसे तिकडे घेऊन जातात. प्रत्येकाला हे माहित आहे की पाकिस्तान हा देश दहशतवादाला पाठिंबा देणारा, प्रोत्साहन देणारा देश आहे. हे उघड आहे. त्यामुळे, त्यांच्या देशातले कलाकार इथे येऊन कसं चालेल? जे शहीद झाले, हा त्यांचा अपमान आहे."
पुढे पुष्कर जोग म्हणाला, "मला असं वाटतं की आता त्यांना उत्तर द्यायला हवं. आता बास झालं. मी सोशल मीडियावर बघतो की पाकिस्तानी लोकांच्या अंगात मस्ती आहे, ती काढायला हवी. ते लोक आगाऊ आहेत. सोशल मीडियावर पाकिस्तानचे काही नागरिक माझ्या ओळखीचे लोक आहेत. जे युकेमध्ये आहेत, ते माझे मित्र आहेत. मी त्यांना अनफॉलो केलं. कारण-मला या गोष्टी पटत नाहीत."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























