Priyanka Chopra and Nick Jonas : प्रियांका चोप्राचा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज, पती निक जोनस सोबत शेअर केले फोटो
Priyanka Chopra and Nick Jonas : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांक चोप्राने (Priyanka Chopra) हॉलिवूडमध्येही (Hollywood) स्वत:ला सिद्ध केलय. बॉलिवूडसोबतचं हॉलिवूडमध्येही तिने अनेक सिनेमे केले आहेत. प्रियांका (Priyanka Chopra) सध्या सोशल मीडियावर सक्रिय असते.
Priyanka Chopra and Nick Jonas : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांक चोप्राने (Priyanka Chopra) हॉलिवूडमध्येही (Hollywood) स्वत:ला सिद्ध केलय. बॉलिवूडसोबतचं हॉलिवूडमध्येही तिने अनेक सिनेमे केले आहेत. प्रियांका (Priyanka Chopra) सध्या सोशल मीडियावर सक्रिय असते. प्रियांका नेहमी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसते. गुरुवारीही (दि.25) तिने कुटुंबियांसोबत वेळ घालवला. तिने पती निक जोनसचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा पती निक आणि मुलगी मालती सोबत दिसत आहे. प्रियांकाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. प्रियांका आणि निक समुद्रकिनारी रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाले आहेत.
प्रियांकाने शेअर केले समुद्रकिनाऱ्यावरिल फोटो
अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. इन्स्टाग्राम स्टोरीज आणि पोस्टच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना अपडेट्स देत असते. नुकतेच प्रियांकाने इन्स्टाग्रामवर पती निक जोनससोबतचे फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत प्रियांका चोप्रा मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. तर पती निक जोनसही रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. याशिवाय प्रियांकाने मुलगी मालती समवेतही काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाची मुलगी मालतीही गोड दिसत आहे.
प्रियांकाने व्हिडीओही केले शेअर
अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) कुटुंबियांसोबतच्या फोटोंबरोबरच काही व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय. फोटोज आणि व्हिडीओ शेअर करताना प्रियांकाने कॅप्शन देखील लिहिले आहे. "Lately ❤️ Full heart, full tummy. 😋" असे प्रियांका चोप्रा म्हणाली आहे.
प्रियांकाला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद
प्रियांकाने (Priyanka Chopra) शेअर केलेल्या पोस्टला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत चाहत्यांनी प्रेम व्यक्त केले आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे बेस्ट कपल असल्याचे चाहत्यांनी कमेट्सच्या माध्यमातून म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी प्रियांकाची मुलगी मालती हिचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या