एक्स्प्लोर

Prathamesh Parab : प्रथमेश परब म्हणाला, 'होय महाराजा'...; गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विनोदी चित्रपटाची घोषणा

Prathamesh Parab : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत आज नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबतीला मराठीतील आणखी विनोदवीरांची मांदियाळी या चित्रपटात दिसणार आहे.

Prathamesh Parab :  मराठी चित्रपट आज जगभरातील प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचं काम करत आहेत. देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही मराठी चित्रपटांची सरशी होत आहे. आशयघन मराठी सिनेमे तिकिटबारीवरही गर्दी खेचत आहेत. गुढी पाडव्याचा (Gudhi Padwa Muhurt) मुहूर्त साधत  आज नव्या मराठी  चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबतीला मराठीतील आणखी विनोदवीरांची मांदियाळी या चित्रपटात दिसणार आहे.

'होय महाराजा' असं शीर्षक असलेला हा चित्रपट रसिकांचे संपूर्ण पैसे वसूल मनोरंजन करणार असल्याचे एल. एस. शेट्टी यांनी म्हटले. या चित्रपटाच्या रूपात एक कौटुंबिक मनोरंजन करणारा धम्माल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

एलएमएस फिल्म्स प्रा. लि. या बॅनरखाली दिग्दर्शक शैलेश एल. एस. शेट्टी यांनी 'होय महाराजा' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता प्रथमेश परब 'होय महाराजा' म्हणत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रथमेश परबने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आता या नव्या चित्रपटात तो कोणत्या भूमिकेत असणार याबद्दल चर्चा सुरू आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Hoy Maharaja (@lms.films)

क्राईम-कॅामेडी प्रकारात मोडणारा हा चित्रपट एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेला आहे. एक सर्वसामान्य तरुण आपल्या प्रेमाखातर कशा प्रकारे लढा देतो या सूत्राभोवती 'होय महाराजा' चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. 

चित्रपटाची स्टारकास्ट काय?

या चित्रपटात प्रथमेशसोबत अंकिता ए. लांडे ही अभिनेत्री दिसणार आहे. त्याशिवाय, अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौगुले असे एका पेक्षा एक अफलातून विनोदवीर या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहेत.

'होय महाराजा' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन संचित बेद्रे यांनी केलं आहे. गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश यांनी स्वरबद्ध केले आहे. वासुदेव राणे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन निलेश नवनाथ गावंड यांनी केलं आहे. पार्श्वसंगीत अमेया नरे, साजन पटेल यांनी दिलं असून, नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकरने केलं आहे. फाईट मास्टर मोझेस फर्नांडीस यांची अॅक्शन चित्रपटात पाहायला मिळणार असून, कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलं आहे. जान्हवी सावंत सुर्वे यांनी वेशभूषा केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Halal Certification : हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, भाजप खासदाराच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी?
हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, भाजप खासदाराच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी?
Sunita Williams : अवघ्या 8 दिवसांसाठी जाऊन तब्बल 280 दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांच्या मार्गातील विघ्ने हटता हटेनात; घरवापसी पुन्हा लांबणीवर
अवघ्या 8 दिवसांसाठी जाऊन तब्बल 280 दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांच्या मार्गातील विघ्ने हटता हटेनात; घरवापसी पुन्हा लांबणीवर
Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर कामं करावं लागणार, नंदन निलेकणींची मोठी भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर काम करावं लागणार,कुणी केली भविष्यवाणी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Ajit Pawar Group:विधान परिषद 1 जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 88अर्ज, 1 नाव अंतिम करणार :सूत्रSatish Bhosale Prayagraj Court : आमदार धस यांचा गुंड कार्यकर्त्याला प्रयागराज कोर्टात हजर करणारNitesh Rane Special Report : इतिहासाचं अज्ञान,  नितेश राणेंच्या विधानांमध्ये धार्मिक द्वेष का?Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 13 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Halal Certification : हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, भाजप खासदाराच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी?
हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, भाजप खासदाराच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी?
Sunita Williams : अवघ्या 8 दिवसांसाठी जाऊन तब्बल 280 दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांच्या मार्गातील विघ्ने हटता हटेनात; घरवापसी पुन्हा लांबणीवर
अवघ्या 8 दिवसांसाठी जाऊन तब्बल 280 दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांच्या मार्गातील विघ्ने हटता हटेनात; घरवापसी पुन्हा लांबणीवर
Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर कामं करावं लागणार, नंदन निलेकणींची मोठी भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर काम करावं लागणार,कुणी केली भविष्यवाणी?
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
LIC : आयपीओ आणल्यानंतर केंद्र पुन्हा एलआयसीतील भागिदारी विकणार, नेमकं कारण काय? 14500 कोटी उभे करणार
केंद्र सरकार एलआयसीमधील भागिदारी विकणार, 2-3 टक्के वाटा कमी करणार,14500 कोटींची उभारणी करणार
Embed widget