Prashant Damle : ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या?'; प्रशांत दामले यांचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल
प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Prashant Damle Video On Allu Arjun dialogue : प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 14 जानेवारी रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जातंय. या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी ही सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेक सेलिब्रिटींनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग्सवर व्हिडीओ तयार केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रशांत दामले यांनी ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या फायर है में…’ या अल्लू अर्जुनच्या डायलॉगचा व्हिडीओ व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिले, ‘काही तरीच होतय हे!’. नेटकऱ्यांनी प्रशांत दामले यांच्या या व्हिडीओला पसंती दिली आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करून त्यांच्या स्टाईलचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील 'पुष्पा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या सिनेमाने एसएस राजामौलीच्या 'बाहुबलीचा' रेकॉर्ड मोडला आहे. सिनेमाने हिंदींत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाकाळातदेखील अल्लू अर्जुनचे चाहते सिनेमा पाहण्यासाठी सिनेमाागृहात जात आहेत. पुष्पा सिनेमाने हिंदीत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. रमेश बाला यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे, पुष्पा सिनेमाने हिंदीत 100 कोटींची कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
Mister Mummy First Look : रितेश आणि जेनेलियानं दिली 'गूड न्यूज' ; 'मिस्टर मम्मी'चा पोस्टर रिलीज
Gangubai Kathiawadi: 'आ रही है गंगू'; बहुचर्चित गंगूबाई काठियावाडीचं नवा पोस्टर प्रदर्शित
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; आलियाचा डॅशिंग अंदाज पाहिलात का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha