एक्स्प्लोर

Prasad Vedpathak White Line Controversy: फक्त एक सोसायटी नव्हे तर अख्ख्या घाटकोपरमध्ये जैन साधू-साध्वींसाठी पांढऱ्या पट्ट्यांच्या पायघड्या, प्रसाद वेदपाठकचा नवा व्हिडीओ व्हायरल

Prasad Vedpathak White Line Controversy: राहत्या सोसायटीच्या आवारात जैन साध्वींसाठी एका जैन कुटुंबीयांनी कोणतीही परवानगी न घेता, पांढरी पट्टी मारल्याचा मुद्दा प्रसाद वेदपाठकनं लावून धरला. पण, आता त्यानं अख्ख्या घाटकोपरमधली परिस्थिती दाखवली आहे.

Prasad Vedpathak White Line Controversy: घाटकोपरमधील (Ghatkopar News) एका सोसायटीच्या आवारात जैन कुटुंबानं (Jain Family) पांढरी पट्टी मारली, इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक (Influencer Prasad Vedpathak) यानं तो प्रश्न उचलला आणि वाद चिघळला. त्यानंतर प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer), कंटेंट क्रिएटर (Content Creator) आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक (YouTuber Prasad Vedpathak) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. स्वतः राहत असलेल्या सोसायटीत मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यामुळे त्याच्यासह त्याची पत्नी आणि आईच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावाही त्यानं केला. पांढऱ्या पट्टीचा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आणि क्षणार्धातच तो तुफान व्हायरल झाला. त्यानं घेतलेल्या भूमिकेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चाही सुरू झाल्या. अखेर पाच दिवसांनी त्या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करण्यात आलं असून स्वत: प्रसादनं व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली आहे. त्यानं त्याच्या सोशल मीडिया हँडलवरुन "माझ्यासाठी हा प्रश्न संपला...", अशा आशयाची पोस्ट करुन पांढरी पट्टी हटवल्याचा व्हिडीओ शेअर केला. अशातच आता प्रसाद वेदपाठकनं शेअर केलेला आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

राहत्या सोसायटीच्या आवारात जैन साध्वींसाठी एका जैन कुटुंबीयांनी कोणतीही परवानगी न घेता, पांढरी पट्टी मारल्याचा मुद्दा प्रसाद वेदपाठकनं लावून धरला. माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. अखेर, ह्या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करण्यात आलं असून स्वत: प्रसादनं याची माहिती दिली आहे. पण, आता प्रसादचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. प्रसादनं या व्हिडीओमध्ये संपूर्ण घाटकोपरमधील परिस्थिती दाखवली आहे. प्रसादनं यापूर्वी बोलताना फक्त सोसायटीच्याच आवारात नाहीतर घाटकोपरमधील फुटपाथवर असे पांढरे पट्टे मारले असल्याचा दावा केलेला. आता प्रसादनं याची झलक आपल्या व्हिडीओतून दाखवली आहे. 

एक सोसायटी नव्हे तर अख्ख्या घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्ट्या, प्रसाद वेदपाठकचा VIDEO

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यानं त्याच्या हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं संपूर्ण घाटकोपमधल्या फुटपाथवर आणि रस्त्यांवर मारलेल्या पांढऱ्या पट्ट्या दाखवल्या आहेत. त्यात त्यानं व्हिडीओवर पांढऱ्या पट्टीवरच काळ्या अक्षरांमध्ये 'WHITE LINE ON FOOTPATH', असं लिहिलंय. तर, पांढऱ्या पट्ट्यांच्या व्हिडीओला ब्रॅकग्राउंडला त्यानं "भगवान, है कहाँ रे तू? ऐ ख़ुदा, है कहाँ रे तू?", हे गाणंही जोडलं आहे. त्यासोबतच प्रसाद वेदपाठकनं व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शनही लिहिलंय. प्रसादनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "घाटकोपर पश्चिम (मुंबई) येथील फुटपाथ, कृपया याच तळमळीनं स्पीड ब्रेकर आणि झेब्रा क्रॉसिंगवरही रंगकाम करा..."

प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीतला पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका काय? 

प्रसाद वेदपाठक याच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी ही पांढऱ्या रंगाची पट्टी मारलेली. यावर प्रसाद वेदपाठक यानं प्रश्न उपस्थित करत आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचं म्हटलं होतं. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी आपली परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावाही प्रसाद वेदपाठक यानं केलेला. प्रसाद वेदपाठक यानं दिलेल्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी मारण्यात आलेली. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी पाळाव्यात सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवलेला. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही प्रसाद वेदपाठक यानं केलेली. त्यानंतर आता त्या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करून पट्टी हटवण्यात आल्याचंही प्रसाद वेदपाठकनं व्हिडीओ शेअर करुन सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट

ABP Majha च्या बातम्या LIVE : 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Box office collection: 2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
OTT psychological Thriller: IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget