एक्स्प्लोर

Prasad Oak Manjiri Oak Daughter In Law: प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...

Prasad Oak Manjiri Oak Daughter In Law: मंजिरी ओकनं तिची होणारी सून अमराठी असल्याचं सांगितलं. तसेच, साखरपुड्यात घडलेला एक प्रसंग सांगितला. 

Prasad Oak Manjiri Oak Daughter In Law: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) लोकप्रिय जोडपं म्हणजे, अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (Manjiri Oak). हे चिरतरुण जोडपं नेहमीच त्यांच्या नात्यामुळे आणि केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतं. आता लवकरच हे जोडपं आपल्या आयुष्याचा एक नवा टप्पा सुरू करणार आहेत. ही लोकप्रिय जोडी सासू-सासरे म्हणून मिरवणार आहे. काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेता प्रसाद ओक याच्या मुलाचा साखरपुडा पार पडला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यानंतर अभिनेत्याच्या मुलाच्या गपचूप उरकलेल्या साखरपुड्याच्या चर्चा रंगल्या. अशातच या चर्चांवर अभिनेत्याची पत्नी मंजिरी ओकनं भाष्य केलंय. 

'अभिजात मराठी फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रसाद ओकची पत्नी आणि निर्माती मंजिरी ओक हिनं आपल्या लेकाच्या साखरपुड्यावर भाष्य केलंय. तसेच, लेकाच्या साखरपुड्याचा कोणताही गाजावाजा करायचा नव्हता, असं बोलताना मंजिरी ओकनं सांगितलं. पण, अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलेल्या पोस्टमुळे सर्वांना कळालं असंही ती म्हणाली. तसेच, पुढे बोलताना मंजिरी ओकनं तिची होणारी सून अमराठी असल्याचं सांगितलं. तसेच, साखरपुड्यात घडलेला एक प्रसंग सांगितला. 

साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली की, समाजात सासू-सुनेच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. त्यावेळी तिची होणारी सून त्यांच्या जवळ येऊन म्हणाली की, काही लोक विचारत आहेत, "हीच तुझी सासू आहे का?" हे तिच्या आईच्या कानावर गेल्यावर त्यांनी तिला 'काकू' ऐवजी 'आई' म्हणायला सांगितलं. मात्र, यावर मंजिरी ओकनं लगेच तिच्या आईला रोखलं आणि तिथेच सांगितलं की, 'आई' हा शब्द खूप खास असतो आणि तो सहज वापरू नये. "आई एकच असते, जी आपल्याला जन्म देते... केवळ औपचारिकतेसाठी मला 'आई' म्हणण्याची गरज नाही. त्यापेक्षा मनापासून आदर आणि आपुलकी असेल तर तेच अधिक महत्त्वाचं आहे...", असं मंजिरी ओक म्हणाली.

सुनेविषयी बोलताना मंजिरी ओक म्हणाली की, "मी तिला पहिल्याच दिवशी सांगितलय की, मी काही परिपूर्ण स्त्री नाही. माझ्याकडूनही चुका होऊ शकतात. त्यामुळे असं धरून चालू नको की, चुका या तुझ्याकडून होतील. माझ्याकडूनही होऊ शकते... गेली 20-25 वर्ष मी एकटीनं संसार करतेय, त्यामुळे माझं घर, माझं स्वयंपाक घर हे सर्व माझं आहे... पण मी असं म्हणणार नाही की, तू त्यामध्ये काहीच बदलू नकोस... आपण हळूहळू पुढे जाऊयात. तुला माझ्याशी काही बोलावसं वाटलं तर बिनधास्त बोल आपण चर्चेतून मार्ग काढू..."

प्रसाद ओक, मंजिरी ओकची सून कोण? 

प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांची होणारी सून ही फिजीओथेरपिस्ट आहे. मुलगा आणि सुनेच्या लव्हस्टोरीबाबत बोलताना मंजिकी ओक म्हणाली की, आमच्या मुलानं मला तिच्याबद्दल लगेच येऊन सांगितलं होतं. तेव्हा तो नुकताच कामाला लागलेला, त्यामुळे मी त्याला म्हटलं की, काही हरकत नाही आपण पुढे जाऊयात... पण सध्या कामावर लक्ष केंद्रीत कर. ती फिजिओथेरपिस्ट आहे, मेडिकलचा अभ्यास खूप असतो, त्यामुळे तिलाही वेळ हवा होता. ती घरी यायची जायची. जेव्हा आमचा मुलगा चांगलं कमवायला लागला तेव्हा आम्ही साखरपुड्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Manjiri Oak on Sons Engagement: 'लेकाच्या साखरपुड्याचा गाजावाजा करायचा नव्हता...'; प्रसाद ओकची बायको सुनेविषयी म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Embed widget