Prarthana Behere : प्रार्थना बेहेरला मूल का नको? अभिनेत्रीची स्पष्टोक्ती; म्हणाली, 'मला मूल असण्याची गरज...'
Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल नुकतच खुलासा केला आहे.
Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) ही आधी मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली त्यानंतर छोट्या पडद्यावरुन घराघरात पोहचली. प्रार्थनाचे सोशल मीडियावरही तितकीच प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर मिलियन्स फॉलोअर्स देखील आहे. पण सध्या प्रार्थना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका निर्णायमुळे बरीच चर्चेत आलीये. तिने नुकतच एका मुलाखतीदरम्यान आईपणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
प्रार्थनाने सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या आयुष्यात मूल का नको यावर भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे प्रार्थनाने वर्षभरापूर्वी मुंबई सोडली त्यावरही प्रार्थना या मुलाखतीमध्ये व्यक्त झाली आहे. सध्या तिच्या या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.
प्रार्थनाला मूल का नको?
प्रार्थना बेहेरे ही वर्षभरापूर्वी अलिबागला कायमची राहण्यासाठी गेली. तिथे तिच्या घरात भरपूर प्राणी आहेत, त्याचप्रमाणे तिच्या नवऱ्याला देखील प्राण्यांची भरपूर आवड असल्याचं तिने यावेळी सांगितलं. त्यामुळे आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला असल्याचं यावेळी प्रार्थनाने सांगितलं. आमच्याकडे खूप प्राणी आहेत, त्यांची आम्ही मुलांप्रमाणे काळजी घेतो, असं देखील प्रार्थनाने यावेळी सांगितलं.
प्रार्थानाने मुंबई का सोडली?
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नुकतीच अलिबागला राहण्यास गेली आहे. यामागचं कारण सांगताना प्रार्थना म्हणाली की, आमची अलिबागला जागा होती. कोविडच्या आधी आम्ही ती घेतली होती. पण कोविडच्या दरम्यान आम्ही ठरवलं की ती जागा आता डेव्हलप करायची आणि अलिबागवरुन प्रवास करणं तसं सोपं आहे. त्याचप्रमाणे आमचे तिथे घोडे, गाई, कुत्रे असं सगळं आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याला आठवड्यातले 4 दिवस तिथे जावं लागायचं. जोपर्यंत मी मालिकेचं शुटींग करत होते, तोपर्यंत मी मुंबईतच होते. पण इथे प्रदूषण असं नाही, पण खूप गर्दी वाटायची.
मला अलिबाग आवडू लागलं - प्रार्थना बेहेरे
मला अलिबागला गेल्यावर तिथे खूप आवडायचं. तिथे छान हिरवळ आणि मोठी जागा आणि तिथे गेल्यावर मी तिथली होऊन जायचे.मी तिथे जाऊन पेंटीग करत, मला आवडतात त्या सगळ्या गोष्टी मी तिथे करते. त्यामुळे मला असं वाटलं की आपण इथे कायमचे राहायला येऊयात. त्यासाठी माझे सासू-सासरे पण तयार झालेत. सुरुवातीला त्याचा थोडा त्रास झाला, पण आता सवय झालीये. वर्ष होईल मी तिथे राहतेय, असा देखील खुलासा यावेळी प्रार्थानाने केला. त्यामुळे आता तिच्या चाहत्यांना तिने मुंबई का सोडली याबाबतची उत्सुकता संपली आहे.