Ankita Walawalkar On Pranit More: 'प्रणित तूच खरा विजेता...', कोकण हार्टेड गर्लची महाराष्ट्रीयन भाऊसाठी खास पोस्ट, फायनलपर्यंतच्या खेळाचं वर्णन करत म्हणाली...
Ankita Walawalkar On Pranit More: प्रणितसाठी 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरनं खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं प्रणितच्या खेळाचं कौतुक केलंय.

Ankita Walawalkar On Pranit More: 'बिग बॉस 19'ची (Bigg Boss 19) ट्रॉफी टेलिव्हिजनचा सुपरस्टार गौरव खन्नानं (Gaurav Khanna) जिंकली, चाहत्यांनी गौरववर कौतुकाचा वर्षाव केला. पण, कुठेतरी साऱ्यांचाच हिरमोड झाला. फक्त महाराष्ट्राचाच नाहीतर अख्ख्या देशाचा लाडका 'महाराष्ट्रीयन भाऊ' (Maharashtrian Bhau) प्रणीत मोरे (Pranit More) जिंकावा अशी अनेकांची इच्छा होती. पण, प्रणीत मोरे तिसऱ्या नंबरवर एलिमिनेट झालेला. बिग बॉसच्या अंतिम फेरीतील व्होट्सच्या ट्रेंडमध्ये प्रणीत मोरेनं मोठी आघाडी घेतलेली. त्यामुळे प्रणीत मोरे यंदाची ट्रॉफी जिंकेल, असंच साऱ्यांना वाटत होतं. पण, जेतेपदावर प्रणीतचा घरातला खास मित्र असलेल्या गौरव खन्नानं नाव कोरलं त्यामुळे प्रणीतच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. पण, नाराज झालेल्या चाहत्यांनी प्रणीत मोरेला मोठा धीर दिला, तसेच, फायनलपर्यंतच्या त्याच्या खेळाचं कौतुक केलं. अशातच प्रणीतसाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Walawalkar) म्हणजेच, कोकण हार्टेड गर्लनं (Kokan Hearted Girl) एक खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रणीतसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अंकिता काय म्हणाली?
अंकिता प्रभू वालावलकरनं प्रणीतच्या खेळाचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं प्रणितच्या खेळाचं कौतुक केलंय. त्यासोबतच अंकितानं 'प्रणित तूच खरा विजेता', अशीही प्रतिक्रिया दिली आहे. अंकितानं इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रणीतचा फोटो शेअर केला आणि म्हटलं की, "छान खेळलास... शिवीगाळ नाही, कुठला अनावश्यक ड्रामा नाही... संपूर्ण प्रवासात तू खूप प्रतिष्ठेनं खेळलास. मतं तर फक्त एक कारणं आहे... आमच्यासाठी तर तू आधीपासूनच विजेता आहेस..."
दरम्यान, यंदाचा 'बिग बॉस 19'चा सीझन प्रचंड गाजला. तसेच, यामध्ये असलेल्या मराठमोळ्या प्रणीत मोरेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारा प्रणित हा लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन, रेडिओ जॉकी आणि कंटेंट क्रिएटर आहे. त्याचं अचूक टायिंग आणि स्ट्रेटफॉरवर्ड स्वभावामुळे प्रणीत मोरे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. याच प्रणीत मोरेनं बिग बॉसच्या घरातही जसा आहे, तसाच राहून आपली रोखठोक मतं मांडली. त्यानं मांडलेल्या सकारात्मक भूमिकांमुळे तो नेहमीच चर्चेचा विषय ठरला.






















