एक्स्प्लोर

Gurupaurnima 2022 : 'माझे तीन आध्यात्मिक गुरु'; गुरुपौर्णिमेनिमित्त प्राजक्ता माळीची खास पोस्ट

प्राजक्तानं (Prajaktta Mali) चाहत्यांना तिच्या तीन आध्यात्मिक गुरुंची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये प्राजक्तानं काही फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन देखील दिलं आहे. 

Prajaktta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्राजक्तानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्तानं चाहत्यांना तिच्या तीन आध्यात्मिक गुरुंची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये प्राजक्तानं काही फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन देखील दिलं आहे. 

प्राजक्ताची पोस्ट
प्राजक्तानं श्री श्री रविशंकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच ओशो आणि बुद्ध यांचे विचार देखील या पोस्टमध्ये प्राजक्तानं मांडले आहेत. प्राजक्तानं पोस्टमध्ये लिहिलं, 'माझे तीन आध्यात्मिक गुरु. श्री श्री रविशंकर यांनी मला सुदर्शन क्रिया आणि ध्यान करण्याची क्रिया सांगितली. ओशो यांनी मला 'ना भोगो ना त्यागो वरन जागो.' हा परम मंत्र सांगितला. तर बुद्धांनी मला जीवनाचे तत्वज्ञान, त्यांनी माझ्या मनाला आणि हृदयाला ट्रेनिंग दिले. त्यांनी मला जीवन जगण्याचा उद्देश दिला. '

पुढे प्राजक्तानं पोस्टमध्ये लिहिलं, ' कधी कधी आपलं जीवनाचं तत्वज्ञान सांगायला भिती वाटते.  ते जाहीर केल्यावर तंतोतंत पाळायची जबाबदारी येते आणि कधी कधी ते बदलतं देखील.  पण माझा आत्ता ह्या क्षणी ह्यांच्यावर विश्वास आहे हे सांगायला हवं, अस मला वाटतं. आणि मी माणूस आहे. पुढे जाऊन मी चुकेन, हरवेन; पण एका माणसामुळे तुम्ही तुम्हांला पटलेल्या “ज्ञानावरचा” विश्वास गमावू नका. ज्ञानावर संशय घेऊ नका. असो , भारतीय गुरू परंपरेतील सर्व गुरूंना, आई- वडील, माझ्या नृत्य आणि योग गुरूंना, शालेय- कॅालेज शिक्षकांना तसेच माझ्या नकळत ज्यांनी ज्यांनी मला घडवलं त्यांना माझा हा virtually साष्टांग दंडवत.' 

View this post on Instagram
 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ता सध्या तिच्या रानबाझार या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये प्राजक्तानं रत्ना ही भूमिका साकारली आहे. रानबाझार सीरिजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच काही महिन्यांपूर्वी लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्राजक्ताबरोबरच या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती.  जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली. 

हेही वाचा:

Prajakta Mali : '108 सूर्यनमस्कार'; फिटनेस फ्रीक प्राजक्ताचा व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशाराABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025Beed Suresh Dhas PC : एकमेकांबद्दल बोलावंच लागतं, कोणाचं काय झालं हे अधिकाऱ्यांना विचारा : धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
Embed widget