'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील प्राजक्ता माळीचा आवडता कलाकार कोणता? नाव न घेता...सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Who Is Prajakta Mali’s Favourite Comedian From Hasya Jatra: अभिनेत्री प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्ट तुफान व्हायरल. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आवडत्या कलाकाराबाबत दिले सूचक उत्तर.

Prajakta Mali: महाराष्ट्राची हास्यजत्रा (MaharashtraChi Hasya Jatra) हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम अल्पावधीतच घराघरात पोहोचला. या शोमधील विविध विनोदी कलाकार आपल्या अफलातून डायलॉग्ससाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांनी आतापर्यंत प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्र पुरता मर्यादित राहिलेला नाही. तर, देशभरात या कार्यक्रमाची चर्चा होते. प्रेक्षकांना या कार्यक्रमातील विविध कलाकार आवडतात. अशातच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने या शोमधील आपला आवडता कलाकार कोण? हे नुकतेच उघड केले आहे. सध्या तिची इन्स्टाग्रामवरील पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अल्पावधीतच महाराष्ट्राची हास्यजत्रा घराघरात पोहोचली. सातासमुद्रापार देखील या कार्यक्रमाने डंका वाजवला. देशविदेशात या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केलं आहे. मुख्य म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन हे देखील या कार्यक्रमाचे रसिक असल्याचं समोर आलं आहे. या कार्यक्रमाची क्रेझ लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत आहे. एकूणच काय तर, या कार्यक्रमातील कलाकारांनी संपूर्ण राज्याच्या प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं आहे.
दरम्यान, प्राजक्ता माळीचा आवडता कलाकार कोणता? हा प्रश्न चाहतावर्गाकडून कायम विचारला जातो. याबद्दल तिनं नुकतंच चाहत्यांना माहिती दिली आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. तिचे सगळे पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतात. अशातच तिनं नुकतंच आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. तिनं इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यावेळी एकानं तिला इन्स्टाग्रामवर 'तुझा आवडता कलाकार कोणता?' असा प्रश्न विचारला. तिनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
तिनं प्रश्नाचं उत्तर देताना कुणाचेच नाव घेतलेले नाही. 'तुम्हाला माहिती आहे, दादा' असं प्रश्नावर उत्तर दिलं आहे. दरम्यान, तिचा आवडता कलाकार अभिनेता समीर चौघुले असू शकतात, असा अंदाज नेटकऱ्यांकडून बांधला जात आहे. प्राजक्ता माळीनं कमी काळात चाहत्यांच्या मनात घर तयार केले आहे. तिनं टिव्ही मालिका ते चित्रपट आणि ओटीटी अनेक व्यासपीठातून आपल्या अभिनयाचं खणखणीत वाजवलं आहे. दरम्यान, ती लवकरच 'देवखेळ' या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.























