VIDEO प्राजक्ता माळीसोबत फोटो काढण्यासाठी चाहत्याचा अट्टाहास, बंद होत असलेली लिफ्ट थांबवली, काय घडलं?
Prajakta Mali Fan stops closing elevator : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्याने बंद होत असलेली लिफ्ट थांबवलीये. यावेळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Prajakta Mali Fan stops closing elevator : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून केलेले काम असो किंवा मराठी सिनेमात साकारलेल्या अनेक भूमिकांच्या माध्यमातून प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) सिनेसृष्टीत स्वत:चं एक वेगळी स्थान निर्माण केलं. कोणतीही पार्श्वभूमी नसताना सिनेक्षेत्रात आलेल्या प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) टेलिव्हिजन आणि सिनेक्षेत्रात मोठी लोकप्रियता मिळवली. दरम्यान, तिची लोकप्रियता एवढी आहे की, महाराष्ट्रात कुठेही गेली तरी चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात.
दरम्यान, प्राजक्ता माळीसोबत (Prajakta Mali) फोटो काढण्यासाठी एका चाहत्याने भलताच अट्टाहास केलाय. एका चाहत्याने प्राजक्ता माळीसोबत फोटो काढण्यासाठी वरती जात असलेली लिफ्ट पायाने अडवून थांबवली आहे. यावेळी प्राजक्ता माळीला थोडा वेळ अडचणींचा सामना करावा लागलाय. मात्र, या चाहत्याने फोटो काढण्याची जिद्द सोडली नाही. त्याने फोटो काढल्यानंतरच प्राजक्ताची (Prajakta Mali) लिफ्ट वरती जाऊ दिली. दरम्यान, प्राजक्ता आणि तिच्या चाहत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
मराठी मनोरंजनसृष्टीतील टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला (Prajakta Mali) ओळखल जातं. अभिनयकौशल्याने आणि स्पष्टवक्तेपणामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सुरुवातीला प्राजक्ताने (Prajakta Mali) टेलिव्हिजन मालिकांतून करियरला सुरुवात केली. यातूनच तिला वेगवेगळ्या भूमिका मिळत राहिल्या. 'जुळून येती रेशीमगाठी' ही तिची मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक म्हणूनही काम केलं आहे आणि तिचा विनोदी अंदाजही प्रेक्षकांनी पसंत केला आहे.
“रानबाजार” सारख्या वेब सिरीज किंवा सिनेमांतूनही तिने बिनधास्त आणि बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांनी केवळ मनोरंजनच नाही तर समाजातील वास्तव, राजकारण, महिलांचे प्रश्न यावरही भाष्य केले. याशिवाय डोक्याला शॉट, पांडू, चंद्रमुखी, खो-खो अशा मराठी सिनेमांमध्ये देखील प्राजक्ता माळीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : प्रेमाच्या गोंधळात खळखळून हसा, रिंकू राजगुरुच्या नव्या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
VIDEO : साई पल्लवीचा 'अप्सरा आली'वर जबरदस्त लावणी डान्स, सोशल मीडियावर धुमाकूळ
























