मराठमोळ्या विनोदी अभिनेत्याच्या लेकीनं बांधली मल्याळी बॉयफ्रेंडशी लग्नगाठ; चाहत्यांच्या 'सासरेबुवांना' शुभेच्छा
त्यांच्या लग्नसमारंभातील फोटो समोर आल्याने अनेकांनी जयवंत वाडकर यांच्यावर तसेच स्वामिनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Marathi Actor Doughter Wedding: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेकांकडे लगीन घाई सुरू आहे. काहींचे लग्नसोहळे झाले आहेत. तर काहींकडे लग्नापूर्वीचे विधी सुरू आहेत. अलीकडेच मराठी टीव्ही अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न झालं. तिने हर्षदा आत्मारामशी लग्न गाठ बांधली. आता लोकप्रिय अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांच्या लेकीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. दक्षिणात्य पद्धतीने त्यांच्या मुलीने स्वामिनी वाडकरने जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या व नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसमारंभातील फोटो समोर आल्याने अनेकांनी जयवंत वाडकर यांच्यावर तसेच स्वामिनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिनेते जयवंत वाडकर झाले सासरे
मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या मुलीचा लग्न सोहळा अलीकडेच पार पडला. तिच्या लग्नाला इंडस्ट्रीतील जवळचे मित्रमंडळी आणि काही कलाकार उपस्थित होते. स्वामिनी वाडकरने दाक्षणात्य पद्धतीने लग्न केलं असून त्या दोघांच्या लग्नातील फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचा पती वरूण नायर मल्याळी आहे. वरूणचं स्वतःचा प्रोडक्शन हाऊस असल्याचं त्याच्या बायोमध्ये लिहिलं आहे. दक्षिणी पद्धतीने झालेल्या या विवाहात दोघांच्या लुकची ही चर्चा रंगली आहे. स्वामिनीने लाल रंगाची कांजीवरम साऊथ साडी व पारंपारिक दागिने परिधान केले आहेत. तर तिचा नवरा वरूण नायर याने मोती रंगाचा झब्बा व धोती असा साउथ लूक केलाय. स्वामिनीच्या विवाह सोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते.यात अभिनय बेर्डे ,प्रिया बेर्डे, स्वानंदी बेर्डे ,शार्दुल पाटकर यांचा समावेश होता.
काही दिवसांपूर्वी अभिनेते जयवंत वाडकर यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाविषयी आणि होणाऱ्या जावयाविषयी सांगितलं होतं. 'दोघेही स्वामीभक्त एकमेकांना भेटल्यामुळे मला आनंद झाला. यापेक्षा वेगळा आनंदच असू शकत नाही. स्वामिनीच्या आयुष्यात आलेला मुलगा वरूण हा सुद्धा स्वामीभक्त आहे. मला माहिती नव्हतं वरून मल्याळम असून, केरळचा असूनही स्वामींचा भक्त आहे. मी दोघांसाठी खरंच खूप आनंदी आहे ' असं ते म्हणाले होते






















