Panchayat season 3 : सचीवजीं येतायत! रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर ट्रेलरची तारीखही ठरली, 'या' दिवशी पाहायला मिळणार 'पंचायत-3' ची पहिली झलक
Panchayat season 3 : बहु्प्रतिक्षित पंचायत-3 या सिरिजच्या ट्रेलरची तारीख जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
Panchayat season 3 : काही वर्षांपूर्वी आलेल्या 'पंचायत' (Panchayat season 3) या सिरिजने अक्षरश: सर्वांना वेड लावलं. त्यानंतर या सिरिजच्या दुसऱ्या सिजनलाही भरपूर प्रेम मिळालं. आता या सिरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्तर प्रदेशातील एका गावतली ही गोष्ट अनेकांना भावली. त्यामळे या सिरिजच्या तिसऱ्या सिजनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत. त्यातच आता या सिरिजचा ट्रेलरही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पंचायत-3चा ट्रेलर येत्या 17 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नुकतीच याविषयीची घोषणा करण्यात आली आहे. TVF म्हणजेच The Viral Fever या प्रोडक्शन हाऊसमधून पंचायतची निर्मिती करण्यात आली आहे. या सिरिजचा तिसरा सिजन हा येत्या 28 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram
पंचायतसंदर्भात मोठी अपडेट समोर
टिव्ही 9 डिजीटलला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंदन रॉयने यावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, आता पंचायत-3चा ट्रेलर येईल. त्यामध्ये तुम्हाला कळेलच की या सीरिजची गोष्ट कशी आणि काय आहे. यामध्ये ज्यामध्ये दारूगोळा, बारूद, आग, आणि बरंच काही असणार आहे. तसेच जिथे पंचायत-3 संपेल तिथूनच पंचायत-4 सुरु होणार आहे.
पुढे त्याने म्हटलं की, पंचायत-3मध्ये अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण पंचायत-4 मध्ये प्रेक्षकांना अशा काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत, ज्याची अपेक्षा प्रेक्षकांनी पंचायतकडून केली नव्हती. 2020 मध्ये या सीरिजचा पहिला पार्ट आला, 2022 मध्ये दुसरा पार्ट आला आणि आता 2024 मध्ये सीरिजचा तिसरा पार्ट येणार आहे. पण पंचायत-4 साठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. त्याचप्रमाणे मेकर्सने देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करुन ठेवला आहे.