एक्स्प्लोर

Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?

विज्ञान मानेच्या कथित मानहानीकारक विधानांमुळे स्वतःची आणि कुटुंबाची प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत नुकसानभरपाई आणि कायमस्वरूपी स्थगितीची मागणी केली होती.

Bombay High court on Palash Muchchal Case: भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मंधनाशी (Smriti Mandhana) लग्न मोडल्यानंतर संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchchal) याच्यावर अनेक आरोप करण्यात आले. 23 नोव्हेंबरला स्मृती आणि पलाशचं लग्न होणार होतं. आधी वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न पुढे ढकळण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर अनेक गोष्टी समोर येत गेल्या आणि अखेर दोघांनीही जाहीरपणे लग्न मोडल्याचं सांगत आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्मृती आणि पलाश दोघेही चर्चेत होते. स्मृती मंधनाचा मित्र व सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर विज्ञान माने याने पलाशवर अनेक गंभीर आरोप केले होते. आर्थिक फसवणुकीचाही दावा त्याने केला होता. या आरोपांनंतर पलाशने विज्ञान मानेवर मानहानीचा दावा दाखल केला होता. या मानहानी प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने विज्ञान मानेला मीडिया मुलाखती आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर पलाश मुच्छल आणि त्याच्या आईविरोधात कथित मानहानीकारक वक्तव्ये करण्यास मज्जाव केला आहे. या आदेशामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कोर्टाने काय म्हटलं?

न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवत म्हटलं की, विज्ञान माने यांच्या मुलाखतींचा आधार 23 नोव्हेंबर 2025 च्या घटनेशी जोडला गेला असला, तरी प्रथमदर्शनी तो या प्रकरणात संबंधित वाटत नाही. विशेषतः जेव्हा फिर्यादी आणि प्रतिवादी यांच्यात व्यावसायिक वाद आहे. मुलाखतींचे ट्रान्सक्रिप्ट तपासल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की दोघांमध्ये व्यावसायिक वाद स्पष्ट दिसतो. मुच्छल हे भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार असून त्यांना सहा पुरस्कार मिळाले असल्याची नोंदही न्यायालयाने घेतली. सर्व बाबींचा विचार करून पीठाने “मजबूत prima facie केस बनत असल्याचे सांगत विज्ञान मानेला पुढील मानहानीकारक उल्लेख किंवा सूचक वक्तव्ये करण्यास अंतरिम बंदी घातलीय.

पलाश मुच्छलने कोर्टाचा दरवाजा ठोठावला

पलाश मुच्छलने वकील सिद्धेश भोले, अश्विन पिंपले आणि श्रेयस मिथारे यांच्या माध्यमातून न्यायालयात धाव घेतलेली. त्याने विज्ञान मानेच्या कथित मानहानीकारक विधानांमुळे स्वतःची आणि कुटुंबाची प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत नुकसानभरपाई आणि कायमस्वरूपी स्थगितीची मागणी केली होती. वकिलांनी सांगितले की या मुलाखतींमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विज्ञान माने हा स्मृती मंधानाचा बालपणीचा मित्र आहे. त्याने पलाश मुच्छलसोबत एक चित्रपट सह-निर्मितीचं  आश्वासन दिलं होत. पालाश्ने मोठी रक्कम गुंतवली; मात्र ठरलेली रक्कम न दिल्याने दोघांत वाद निर्माण झाला. याच काळात मुच्छल आणि मंधाना यांचे लग्न तुटले आणि त्यानंतर विज्ञान माने याने दिलेल्या मुलाखतींना पलाश मुच्छल मानहानीकारक म्हटलेले.

40 लाखांची फसवणूक, 10 कोटींची मानहानी नोटीस 

दरम्यान, सांगलीत दाखल तक्रारीत विज्ञान माने याने आरोप केला होता की पलाशने चित्रपट निर्मितीसाठी त्यांच्याकडून 40 लाख रुपये घेतले, मात्र चित्रपट पूर्ण झाला नाही. तसेच त्यांनी एका मुलाखतीत मुच्छल आणि मंधाना यांचे लग्न तुटण्याबाबतही वादग्रस्त दावा केला होता. या पार्श्वभूमीवर पलाश मुच्छलने इन्स्टाग्रामवर अधिकृत निवेदन देत सांगितले की, त्यांच्या वकील श्रेयांश मिथारे यांनी विद्यान मानेला 10 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठवली आहे. “माझी प्रतिमा आणि करिअर जाणीवपूर्वक खराब करण्यासाठी खोटे आणि अत्यंत मानहानीकारक आरोप करण्यात आले,” असे त्याने नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget