OTT Release This Week : 'या' आठवड्यात ओटीटी मनोरंजनाचा धमाका; रिलीज होणार 7 चित्रपट-वेब सीरिज, कपिलचे कमबॅक
OTT Release This Week : या आठवड्यात ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याशिवाय, सहा चित्रपट आणि वेब सीरिज देखील रिलीज होणार आहे.
OTT Release This Week : मागील काही दिवसात अनेक चित्रपटांसह वेबसिरिज OTT वर प्रदर्शित झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. ड्रामा, सस्पेन्स, क्राईम-थ्रिलर अशा वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना ओटीटीवर मिळणार आहे. या आठवड्यात ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याशिवाय, सहा चित्रपट आणि वेब सीरिज देखील रिलीज होणार आहे.
द ग्रेट इंडियन कपिल शो...
कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनची सुरुवात होणार आहे. या सीझनमध्ये अनेक सेलेब्ससह द फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलिवूड वाइव्स या सीरिजची स्टारकास्ट दिसणार आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' 21 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
ए व्हेरी रॉयल स्कँडल
'ए व्हेरी रॉयल स्कँडल' मध्ये एमिली मेईतलीची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. तिने प्रिन्स अँड्र्यूची मुलाखत घेतली होती. 16 सप्टेंबरपासून ही सीरिज अॅमेझॉन प्राईमवर स्ट्रीम होणार आहे.
व्हॉट्स नेक्झट? द फ्यूचर विथ बिल गेट्स
या मिनी वेब सीरिजमध्ये बिल गेट्स भविष्यातील तंत्रज्ञानाबाबत भाष्य करताना दिसणार आहेत. ही मिनी वेब सीरिज 18 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
थलेवट्टम पालम
ही वेब सीरिज ओटीटीवरील लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'चा रिमेक आहे. हा रिमेक 'थलेवत्तम पालम' तामिळमध्ये बनवला आहे. हिंदीत सचिवाची भूमिका जितेंद्र कुमार यांनी केली होती. तर अभिषेक कुमार ही भूमिका तमिळमध्ये करत आहे. ही वेब सीरिज 20 सप्टेंबर पासून Amazon Prime Video वर स्ट्रीम होणार आहे.
लाल सलाम
सुपरस्टार रजनीकांत यांची भूमिका असलेला लाल सलाम हा चित्रपट मोठ्या प्रतिक्षेनंतर ओटीटीवर रिलीज होत आहे. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी सन एनएक्सटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.
तंगलान
बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर चियान विक्रमचा 'टांगलान' चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
जो तेरा है वो मेरा है...
अभिनेते परेश रावल यांची भूमिका असलेला 'जो तेरा है वो मेरा है' हा कॉमेडी चित्रपट 20 सप्टेंबर रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात परेश रावल यांच्याशिवाय, फैसल मलिक, सोनाली कुलकर्णी आणि सोनाली सेगल यांच्याही भूमिका आहेत.