एक्स्प्लोर

OTT Release This Weekend : 'बॅड कॉप' ते 'महाराज'; वीकेंडला 'हे' वेब सीरिज-चित्रपट धुमाकूळ घालणार

OTT Release This Weekend : रिॲलिटी शो ड्रामा 'बिग बॉस ओटीटी 3' ते थ्रिलर, ॲक्शनपॅक्ड सिनेमा, वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत.

OTT Release This Weekend :  हा वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा अशा वेगवेगळ्या  धाटणीच्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज पाहता येणार आहेत.  त्याशिवाय,  रिॲलिटी शो ड्रामा 'बिग बॉस ओटीटी 3'  देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

> महाराज Maharaj Movie 

आमिर खानचा मुलगा झुनैदची भूमिका असलेला महाराज चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. गुजरात हायकोर्टाने या चित्रपटावर स्थगिती लावली होती. मात्र, त्यानंतर कोर्टाने ही स्थगिती हटवल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. झुनैद सोबत  जयदीप अहलवातची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. 

कोणत्या ओटीटीवर रिलीज? नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज झाला आहे. 

> बॅड कॉप Bad Cop 

गुलशन देवाईया, हरलीन सेठी, अनुराग कश्यप यांची भूमिका असलेला क्राईम थ्रिलर 'बॅड कॉप' ही वेब सीरिज ओटीटीवर रिलीज झाली आहे. 90 काळातील ही गोष्ट आहे. वैयक्तिक पातळीवर संघर्ष करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा एका गँगस्टरला अटक करण्याच्या कामगिरी भोवती या सूत्राभोवती वेब सीरिजची गोष्ट आहे. 

कोणत्या ओटीटीवर रिलीज?  डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 21 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजचे दोन एपिसोड रिलीज झाले आहेत.

>> कोटा फॅक्टरी सीझन 3 Kota Factory Season 3

नीट-जेईईच्या परीक्षा देण्यासाठी देशभरातील विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे जाऊन तयारी करत असतात. या कोटामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर आधारीत असलेली 'कोटा फॅक्टरी' ही वेब सीरिज गाजली. आता या वेब सीरिजचा पुढील सीझन या आठवड्यात रिलीज होत आहे.

कोणत्या ओटीटीवर कधी रिलीज होणार? - नेटफ्लिक्सवर 20 जून रोजी रिलीज झाला आहे.

>> अरनमनई-4 Aranmanai 4

तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना यांची भूमिका असलेला हॉरर-कॉमेडीपट 'अरनमनई 4' ओटीटीवर रिलीज होणार आहे. तमिळ भाषेत असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती.  

कोणत्या ओटीटीवर कधी रिलीज होणार? - डिस्नी हॉटस्टार प्लसवर 21 जून रोजी रिलीज झाला आहे.

> ट्रिगर वॉर्निंग 

ट्रिगर वॉर्निंग हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी  जेसिका एल्बा आहे. वडिलांच्या निधनानंतर जेसिका एका कुख्यात टोळीचा भाग कशी होते, तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, यावर चित्रपटाची कथा आहे. 

कोणत्या ओटीटीवर रिलीज? नेटफ्लिक्सवर 21 जूनपासून चित्रपट स्ट्रीम होत आहे,

>> हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन 2 House Of Dragon Season 2

जॉर्ज आरआर मार्टिन यांच्या 'फायर अॅण्ड ब्लड'  कांदबरीवर आधारीत 'हाऊस ऑफ ड्रॅगन' ही वेब सीरिज आहे. या सीझनमधील कथानक हे किंग वायसर्सच्या मृत्यूनंतर काय घडतं यावर आधारीत आहे. 

कोणत्या ओटीटीवर रिलीज? - ही वेब सीरिज 17 जूनपासून जिओ सिनेमावर स्ट्रीम होत आहे. 

>> एजेंट्स ऑफ मिस्ट्री

सस्पेन्स-थ्रिलर असलेली एजेंट्स ऑफ मिस्ट्री ही वेब सीरिज तुम्हाला पाहता येईल. काही चौकशी अधिकाऱ्यांना एक टास्क दिला जातो. आता हा टास्क कसा पूर्ण करतील, त्यात काय अडचणी येतील, गूढ काय याभोवती ही वेब सीरिज आहे. 

कोणत्या ओटीटीवर रिलीज? ही  वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 18 जूनपासून स्ट्रीम होत आहे. 

>> आऊटस्टँडिंग - ए कॉमेडी रिव्होल्यूशन 

LGBTQIA+ समुदाय आणि त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य करणारी ही डॉक्युमेंटरी सीरिज आहे. 

कोणत्या ओटीटीवर रिलीज? ही  वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 19 जूनपासून स्ट्रीम होत आहे. 

>> लव्ह इज ब्लाइंड

लव्ह इज ब्लाइंड या वेब सीरिजचे पहिले तिन्ही सीझन हिट झाले होते. चौथ्या सीझनमध्ये काही नवीन चेहरे दिसणार आहेत. 

कोणत्या ओटीटीवर रिलीज? ही  वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 19 जूनपासून स्ट्रीम होत आहे. 

>> गँग्स ऑफ गॅलिसिया

या वेब सीरिजची गोष्ट अॅना नावाच्या एका वकिलाच्या भोवती फिरते. एका शहरात स्थायिक झाल्यानंतर एका ड्रग्ज डिलरसोबत तिची गाठ पडते. त्यानंतर अॅनाच्या आयुष्यात घडामोडी घडतात की जिचा विचार तिने केलेला नसतो. 

कोणत्या ओटीटीवर रिलीज? ही  वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 21 जूनपासून स्ट्रीम होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget