एक्स्प्लोर

OTT Action Thriller: OTT वर येतोय थ्रिलरचा बाप! 69 वर्षांचा अभिनेता, जबरदस्त ॲक्शन अन् अंगावर काटा आणेल 'ही' कल्ट सीरिज

या सीरिजच्या प्रचंड लोकप्रियतेचा विचार करून ओटीटी प्लॅटफॉर्मने हा निर्णय घेतला आहे.

Action Thriller Series On OTT: ओटीटीवर दररोज काही ना काही नवीन पाहायला मिळत असताना आता एक गाजलेली कल्ट सीरिज (Cult Webseries) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटीच्या दुनियेत पुन्हा एकदा या सिरीजची एकच चर्चाय. या सिरीजमधून काही वर्षांपूर्वी बॉलीवूडच्या 69 वर्षीय अभिनेत्याने आपल्या अभिनय आणि ॲक्शनने सर्वांची मनं जिंकली होती. विशेष म्हणजे, ही सीरिज 'अमेरिकन 24' या लोकप्रिय ड्रामाचा हिंदी रिमेक आहे. अनेक वर्षांनंतर आता ही सीरिज OTT वर पुन्हा येत असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. (OTT Action Thriller Series)

‘24’ मध्ये पुन्हा दिसणार अनिल कपूर 

अनिल कपूर यांची ब्लॉकबस्टर ॲक्शन-थ्रिलर सीरिज 24 पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. नुकतीच याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अनिल कपूर (Anil Kapoor) आणि JioHotstar यांनी ही माहिती दिली असून ‘24’ चे दोन्ही सीझन येत्या 24 एप्रिलपासून JioHotstar वर स्ट्रीम होणार आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी या हाय-ऑक्टेन थ्रिलरचे 8 एपिसोड दर शुक्रवारी रिलीज केले जाणार आहेत. या सीरिजच्या प्रचंड लोकप्रियतेचा विचार करून ओटीटी प्लॅटफॉर्मने हा निर्णय घेतला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अनिल कपूरही यांच्या जवळचा प्रोजेक्ट 

या सीरिजच्या OTT पुनरागमनाबाबत अनिल कपूर यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. ते म्हणाले, “मी माझ्या करिअरमध्ये अनेक ॲक्शन आणि इंटेन्स भूमिका केल्या, पण ‘24’ माझ्यासाठी केवळ एक शो नव्हता. त्याची ऊर्जा, वेग आणि रिअल-टाइम स्टोरीटेलिंगने मला अभिनेता आणि स्टोरीटेलर म्हणून सतत आव्हान दिलं. हा प्रोजेक्ट माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. आता ही सीरिज JioHotstar वर येत असल्याने प्रेक्षकांनी पुन्हा तोच थरार अनुभवावा, अशी माझी इच्छा आहे.”

थ्रिलरप्रेमींसाठी पुन्हा पर्वणी

‘रेस अगेंस्ट टाइम’ या संकल्पनेवर आधारित असलेली ही सीरिज नेहमीच प्रेक्षकांना खुर्चीच्या टोकावर बसवते. दमदार कथा, वेगवान घडामोडी आणि थरारक मांडणीमुळे ‘24’ ही थ्रिलरप्रेमींसाठी आवडती सीरिज ठरली आहे. ही सीरिज पूर्वी Colors TV वर प्रसारित झाली होती. यामध्ये अनिल कपूरसोबत नील भूपालम, मंदिरा बेदी, साक्षी तंवर, आशीष विद्यार्थी, अनीता राज, टिस्का चोप्रा यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा:

Dhurandhar 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?

 

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi: सेटवरच अवतरली पंढरी! आरती, अभंग आणि वारकऱ्यांच्या सेवेत रंगले 'सनई चौघडे' आणि 'कमळी'चे कलाकार
सेटवरच अवतरली पंढरी! आरती, अभंग आणि वारकऱ्यांच्या सेवेत रंगले 'सनई चौघडे' आणि 'कमळी'चे कलाकार
Manoj Muntashir On Student Protest: 'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
Ankita Walavalkar on CJP Protest: 'अनफॉलो करा पण...', CJP आंदोलनावरून अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली, 'प्रत्येक जण आपापली पोळी भाजून...'
'अनफॉलो करा पण...', CJP आंदोलनावरून अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली, 'प्रत्येक जण आपापली पोळी भाजून...'
Batatyachi Chal Marathi Theatre Play: चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार
चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
Embed widget