एक्स्प्लोर

Batatyachi Chal Marathi Theatre Play: चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार

Batatyachi Chal Marathi Theatre Play: पु. ल. देशपांडे यांनी सामान्य माणसांच्या जगण्यातील विनोद, आपुलकी, संघर्ष, नात्यांमधील ऊब आणि चाळसंस्कृतीचे जिवंत चित्र शब्दबद्ध केलेत.

Batatyachi Chal Marathi Theatre Play: मराठी साहित्यविश्वातील पु. ल. देशपांडे (Purushottam Laxman Deshpande) लिखित 'बटाट्याची चाळ' (Batatyachi Chal) या अजरामर साहित्यकृतीतील 'एक संगीतक' या संकल्पनेला नव्या रंगमंचीय रूपात प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न 'या इथे चाळ बटाट्याची' (Ya Ithe Chawl Batatyachi) या दोन अंकी आणि 21 कलाकारांसह गद्य संवाद विरहित भव्य मराठी संगीतिकेतून करण्यात आला आहे. या संगीतिकेचे शुभारंभाचे प्रयोग लवकरच रंगणार असून, मराठी रंगभूमीवरील हा एक वैशिष्ट्यपूर्ण संगीतप्रयोग ठरणार आहे.

पु. ल. देशपांडे यांनी सामान्य माणसांच्या जगण्यातील विनोद, आपुलकी, संघर्ष, नात्यांमधील ऊब आणि चाळसंस्कृतीचे जिवंत चित्र शब्दबद्ध केले. त्याच साहित्याचा आत्मा जपत, आजच्या पिढीशी संवाद साधणाऱ्या नव्या संगीतभाषेत हे नाट्यरूपांतर साकारण्यात आले आहे. संवाद, गीत, संगीत आणि बहुपात्री रंगमंचीय मांडणी यांच्या माध्यमातून चाळीतील जीवनाचा हृदयस्पर्शी आणि रंजक पट या संगीतिकेत उलगडणार आहे.

'या इथे चाळ बटाट्याची' याचे मूळ लेखन व संगीत- पु.ल.देशपांडे यांचे आहे. कार्यक्रमाची निर्मिती कपीश जोशी यांची असून दिग्दर्शन देवेंद्र भोमे, योगेश सप्रे यांचे आहे. संगीत दिग्दर्शन देवेंद्र भोमे यांचे असून नाट्यरूपांतर योगेश सप्रे यांचे आहे. पंढरीनाथ कांबळे, अजित परब, मिलिंद जोशी, आशुतोष मुंगळे, अंजली मराठे, शमिका भिडे, स्वरांगी मराठे, केतन पवार, वज्रांग आफळे, मधुरा आफळे, तन्वी परांजपे, इशिता सावळे, साक्षी देशपांडे अशी दमदार कलाकारांची फळी या कार्यक्रमातून  आपल्या भेटीस येणार आहे. वाद्यवृंद कलाकारमंडळीमध्ये  मंदार बगाडे, ओमकार जोशी, सई जोशी, सिद्धी देशपांडे, तनिष्का जोशी , दीप वैद्य, स्वप्नील कुंभार, केदार जाधव यांची उत्तम साथ मिळणार आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना सुजय भडकमकर, वेशभूषा गायत्री चक्रदेव, नृत्य रचना मधुरा आफळे, निर्मिती सूत्रधार नितीन नाईक, पराग पब्लिसिटी तर सूत्रधार मयूर वैद्य आहेत. 

पारंपरिक मराठी संगीत रंगभूमीचा वारसा आणि आधुनिक रंगभाषेचा संगम घडविण्याचा प्रयत्न या निर्मितीत करण्यात आला असून, पुलंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांसह नव्या पिढीलाही ही संगीतिका एका वेगळ्या अनुभवाची मेजवानी ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

शुभारंभाचे प्रयोग कुठे?

  • 1 ऑगस्ट 2026 : दुपारी 12.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
  • 8 ऑगस्ट 2026 : सायंकाळी 4 वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई

महत्त्वाच्या इतर बातम्या :

4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget