एक्स्प्लोर

Ramayan Trailer Date Out: 'रामायण'च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली! निर्मात्यांनी तारखेसह ब्रम्हमुहूर्त काढला, कधी येणार ट्रेलर?

पहिला भाग ऑक्टोबर 2026 मध्ये दिवाळीपूर्वी जगभर प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ramayan Trailer Date Out: रणबीर कपूर आणि यश यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटाच्या ट्रेलरची (Ramayan Trailer) चाहत्यांची प्रतीक्षा आता जवळपास संपली आहे. आधी 24 जुलैला प्रदर्शित होणार असलेला हा ट्रेलर पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे ट्रेलर नेमका कधी रिलीज होणार, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.मात्र, मंगळवारी निर्मात्यांनी अधिकृत घोषणा करत ट्रेलरची तारीख आणि मुहूर्त जाहीर केला आहे. 

कधी रिलीज होणार ट्रेलर?

इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर करत मेकर्सने लिहिले, "शुभ ब्रह्ममुहूर्तावर आम्ही 30 जुलै 2026, गुरुवारी पहाटे 4.15 वाजता (भारतीय वेळेनुसार) जगभरात 'रामायण'च्या ट्रेलरद्वारे या महाकाव्याचा उदय साजरा करणार आहोत."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Namit Malhotra (@iamnamitmalhotra)

ट्रेलर का पुढे ढकललेला?

खरंतर रामायणचा अधिकृत ट्रेलर 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता.मात्र देशातील विद्यार्थी आंदोलन आणि सोनी पिक्चर्स सोबतच्या वितरण प्रक्रियेमुळे ट्रेलरचे प्रदर्शन पुढे ढकळण्यात आल्याचा सांगण्यात आलं. नमित मल्होत्रा यांनी 24 जुलै रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले होते, "आज 'रामायण'साठी अत्यंत खास दिवस आहे. सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटसोबतच्या भागीदारीमुळे 'रामायण' जगभर पोहोचवण्याचे माझे स्वप्न आता साकार होत आहे. या महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घेऊन आम्ही ट्रेलरचे जागतिक स्तरावरील लाँच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे."

नमित मल्होत्रा म्हणालेले, "भारतीय चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 'रामायण'ला एखाद्या मोठ्या हॉलीवूड चित्रपटाप्रमाणे जगभरात प्रदर्शित केले जाणार आहे. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असेल. जगभरातील प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीची आणि आपल्या महान कथांची ओळख नव्या अभिमानाने करून देण्याची ही मोठी संधी आहे. हे शक्य करून दाखवण्यासाठी सर्व चाहत्यांचे आणि रामायणाच्या भक्तांचे मनापासून आभार. आपल्या देशातील युवा हीच आपली खरी ताकद आहे. चला, आपल्या उज्ज्वल भविष्याकरिता आपण सर्वजण एकत्र काम करूया."

'रामायण'बद्दल खास माहिती

'रामायण' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असून, त्याचा एकूण खर्च सुमारे 4,000 कोटी रुपये आहे. प्रखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीत निर्माता नमित मल्होत्रा म्हणाले, "सहा-सात वर्षांपूर्वी आम्ही हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना मी वेडा झालो आहे, असं वाटलं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीय चित्रपट कधीच बनला नव्हता. दोन्ही भागांचा मिळून एकूण बजेट सुमारे 500 मिलियन डॉलर्स, म्हणजेच 4,000 कोटी रुपयांहून अधिक आहे." ते पुढे म्हणाले, "आम्ही जगातील सर्वात भव्य चित्रपट बनवत आहोत. अशा महान महाकाव्यावर आधारित चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचायला हवा. हॉलीवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांच्या तुलनेत आम्ही हा चित्रपट अधिक कार्यक्षम पद्धतीने तयार करत आहोत. आम्ही अवास्तव नाही, तर महत्त्वाकांक्षी आणि तितकेच व्यावहारिक आहोत."

स्टारकास्ट आणि रिलीज

'रामायण'मध्ये रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून साई पल्लवी सीतेच्या, सनी देओल हनुमानाच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ऑक्टोबर 2026 मध्ये दिवाळीपूर्वी जगभर प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Rajwade Natak: रहस्य अन् तपासाचा थरार! सतीश राजवाडे पुन्हा इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत, 'या' नाटकाची प्रचंड चर्चा
रहस्य अन् तपासाचा थरार! सतीश राजवाडे पुन्हा इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत, 'या' नाटकाची प्रचंड चर्चा
Gautami Patil On Viral Video Controversy: 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रो फायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रो फायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Embed widget