Nita Ambani : नीता अंबानी यांचा 'विश्वंभरी स्तुति'वर मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स, देवीकडे मागितला आशीर्वाद; व्हिडीओ व्हायरल
Nita Ambani In Anant-Radhika Pre Wedding : नीता अंबानीच्या परफॉर्मन्सने आपली वेगळीच छाप सोडली. परंपरा आणि अध्यात्म यांचा मेळ साधताना नीता अंबानी यांनी विश्वंभरी स्तुतीवर एक मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले.
Nita Ambani In Anant-Radhika Pre Wedding : रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंगचा शाही कार्यक्रम गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सेलिब्रेटींपासून ते अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परफॉर्मन्स सादर केले. मात्र, नीता अंबानीच्या परफॉर्मन्सने आपली वेगळीच छाप सोडली. परंपरा आणि अध्यात्म यांचा मेळ साधताना नीता अंबानी यांनी विश्वंभरी स्तुतीवर एक मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नीता अंबानींनी 'या देवी सर्वभूतेषु'वर दिला शानदार परफॉर्मन्स
नीता अंबानी या नृत्य कलेत निपुण आहेत. त्यांनी अनेकदा अंबानी कुटुंबातील कार्यक्रमांमध्ये नृत्य सादर केले आहेत. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या शेवटच्या दिवशी नीता अंबानी यांनी आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली. नीता अंबानी यांनी 'या देवी सर्वभूतेषु' वर तिच्या नृत्याने (नृत्य) देवी अंबेला आवाहन केले. नीता अंबानींच्या या परफॉर्मेन्सची आणखी एक खास गोष्ट हे सादरीकरण त्यांनी नातवंड आदिया आणि वेद यांना समर्पित केली.
View this post on Instagram
नीता अंबानींच्या या अप्रतिम डान्स परफॉर्मन्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीता अंबानी लहानपणापासून प्रत्येक नवरात्रीत हे भजन ऐकत आहेत. आपला मुलगा अनंत आणि त्याची भावी पत्नी राधिका मर्चंट यांच्या भावी आयुष्यासाठी आई अंबेचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी हे गाणे सादर केले.
रोमँटिक गाण्यावर थिरकले मुकेश अंबानी अन् नीता अंबानी
अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे रोमँटिक गाण्यावर थिरकले.
View this post on Instagram
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी 'श्री 420' या सिनेमातील 'प्यार हुआ इकरार हुआ है' या गाण्यावर थिरकले. या व्हिडीओमधील दोघांचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. 'प्यार हुआ इकरार हुआ है' या गाण्यावर थिरकतानाचा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लूक खूप खास आहे. नीता यांनी साडी नेसली असून नुकेश यांनी सूट परिधान केला आहे. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत.