एक्स्प्लोर

Neha Pendse: 'जॉगिंग करताना आधी पत्ता विचारला, मग जबरदस्ती मला पकडलं अन्.. ' ;अभिनेत्री नेहा पेंडसेनं सांगितला भयाण प्रसंग, म्हणाली..

नेहा पेंडसे ही केवळ अभिनेत्री नाही तर एक लोकप्रिय निर्माती आहे.तिने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

Neha Pendse: मराठी मनोरंजनसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिची एक मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराविषयी सांगितलं. मुंबईच्या एका रस्त्यावर एका व्यक्तीने केलेल्या जबरदस्ती विषयी ती बोलली आहे. जॉगिंगला गेलेली असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीने जबरदस्ती धरलं आणि गाडी पळवू लागला. असं नेहा म्हणाली. अभिनेत्री नेहा पेंडसे ने अलीकडेच तिच्या आयुष्यात घडलेला भयानक प्रकार शेअर केला आहे. या घटनेमुळे तिच्या मनात निर्माण झालेली भीती अजूनही कायम असल्याचे तिने सांगितलं.

काय म्हणाली नेहा पेंडसे ?

'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मी जेव्हा अंधेरीमध्ये राहत होते, त्यावेळेला लोखंडवाला रोडवर धावायला जायचे. झालं असं की, हिवाळा होता आणि सुर्योदय व्हायला थोडा वेळ होता. सकाळच्या 5.50 वाजता रोडच्या विरुद्ध बाजूने एक माणूस आला. त्याने आधी मला काहितरी दिशा विचारली. ' मला इथे जायचंय, कसं जायचं वगैरे ... ' आधी त्याने हर हळू आवाजात विचारलं. त्यामुळे मला त्या माणसाजवळ जावं लागलं, तो काय म्हणतोय हे ऐकण्यासाठी. तेवढ्या वेळेत त्याने मला पकडलं आणि जोरात गाडी पळवायला लागला. "

ती पुढे म्हणाली 'त्यावेळी  माझ्या हातात माझ्या गाडीची चावी होती. त्याच्या आधीचा मोठा रिमोट मी त्याच्या गाडीला मारला. मागच्या काचेवर तो जोरात लागला. त्यामुळे त्या माणसाने ब्रेक मारला. तो माणूस थांबला आणि माझ्या आजूबाजूला कोणीही नाही. त्या एका क्षणात जर त्याने गाडी रिव्हर्स घेतली असती आणि माझ्यासोबत काही केलं असतं तर ... ती भीती प्रचंड भेदरवून टाकणारी होती. त्या माणसाने एका सेकंदात फक्त काच फुटली की नाही एवढं बघितलं आणि तो निघून गेला. मला थोड्यावेळ काहीही सुचत नव्हतं. मला रोज धावताना पाहणारे लोक जमा होऊ लागले. रोज धावणारी ही मुलगी अशी का चालते हे त्यांना कळेना. मी माझ्या गाडीचा रिमोट शोधत होते. मला काहीही सुचत नव्हतं.मी त्या जमलेल्या लोकांना नजरही भिडवू शकत नव्हते. बसा बसा मी माझ्या गाडीचा रिमोट घेतला आणि तिथून पळून गेले. "  हा माझ्या आयुष्यातील एक प्रसंग होता असं अभिनेत्री नेहा पेंडसे म्हणाली.

नेहा पेंडसेच्या कामाविषयी..

नेहा पेंडसे ही केवळ अभिनेत्री नाही तर एक लोकप्रिय निर्माती आहे.तिने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.तिचा पहिला शो कॅप्टन हाऊस हा एक हॉरर शो होता. त्यावेळी नेहा फक्त दहा वर्षांची होती. त्यानंतर नेहाने हसरतें, पडोसन यासारख्या मालिकांमध्ये काम केले.नटसम्राट, नुकताच प्रदर्शित झालेला आम्ही तिघी या सिनेमातही तिच्या भूमिकेचा कौतुक झालं. टीव्ही मालिका व्यतिरिक्त तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केला आहे. तिचा पहिला चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झालेला 'दाग : द फायर ' होता . त्यानंतर ती प्यार कोई खेल नही सारख्या चित्रपटांमध्ये ही दिसली.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajput Make MS Dhoni Angry: सुशांत सिंह राजपूतमुळे चिडलेला MS धोनी; अभिनेत्याच्या 'त्या' एका कृतीनं 'कॅप्टन कूल'चा सुटलेला संयम, नेमकं काय घडलेलं?
सुशांत सिंह राजपूतमुळे चिडलेला MS धोनी; अभिनेत्याच्या 'त्या' एका कृतीनं 'कॅप्टन कूल'चा सुटलेला संयम, नेमकं काय घडलेलं?
The Odyssey First Review Out: ख्रिस्तोफर नोलनच्या 'द ओडिसी'चा फर्स्ट रिव्यू; फिल्म पाहून क्रिटिक्स भारावले, भव्यतेनं डोळे दिपले... म्हणाले, 'मास्टरपीस...'
ख्रिस्तोफर नोलनच्या 'द ओडिसी'चा फर्स्ट रिव्यू; फिल्म पाहून क्रिटिक्स भारावले, भव्यतेनं डोळे दिपले... म्हणाले, 'मास्टरपीस...'
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
Maharashtra Epstein Files Swaroop sawant: रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News: खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget