Neflix Launch New Feature Skip Adult Scene Fact Check: नेटफ्लिक्सवर आई-वडिलांसोबत बसून पाहू शकता A रेटेड फिल्म्स; OTT प्लॅटफॉर्मवर आलाय नवा ऑप्शन?
Netflix Launch New Feature Skip Adult Scene Fact Check: गेल्या दोन दिवसांपासून, सोशल मीडियावर एक चर्चा रंगलीय की, नेटफ्लिक्सनं 'स्किप अडल्ट सीन्स' नावाचं एक नवं फिचर जोडलंय.

Neflix Launch New Feature Skip Adult Scene Fact Check: जर तुम्ही आई-वडिलांसोबत किंवा तुमच्या लहान भावंडांसोबत, मुलांसोबत फिल्म पाहत असाल आणि अचानक स्क्रिनवर अडल्ट सीन आला तर, ऑक्वर्ड वाटतं ना? लगेच आपण फिल्म फॉरवर्ड करतो किंवा चॅनल चेंज करतो. अशातच नेटफ्लिक्सच्या एका फिचरची जोरदार चर्चा रंगलीय.
नेटफ्लिक्स जगातील सर्वात मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, ज्याचे 30 कोटींहून अधिक पेड सब्स्क्राइबर्स आहेत. हे फक्त इतर देशांपुरतं मर्यादित नाही. भारतातही नेटफ्लिक्सचे खूप सब्स्क्राइबर्स आहेत. तसेच, भारतातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेटफ्लिक्स प्रादेशिक शीर्षकांचाही प्रचार करताना दिसतंय. याचं सध्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर, 'वश लेवल 2' हा गुजराती सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणं.
गेल्या दोन दिवसांपासून, सोशल मीडियावर एक चर्चा रंगलीय की, नेटफ्लिक्सनं 'स्किप अडल्ट सीन्स' नावाचं एक नवं फिचर जोडलंय. ट्विटर आणि इंस्टाग्रामवरील अनेक पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नेटफ्लिक्सनं एक फिचर लॉन्च केलंय, जे युजर्स सिनेमा किंवा वेब सीरिजमधील इंटिमेट सीन्स वगळण्यासाठी वापरु शकतात. कुटुंबासह चित्रपट पाहताना अचानक स्क्रीनवर अडल्ट सीन्स दिसल्यास किती विचित्र वाटतं? हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच, या फिचर्सच्या चर्चांना उधाण आलंय... पण खरंच नेटफ्लिक्सनं असं फिचर दिलंय का?

नेटफ्लिक्सवर 'स्किप एडल्ट सीन'चं फिचर आलंय?
पण सत्य हे आहे की, नेटफ्लिक्सनं असं कोणतंही फीचर आणलेलं नाही. 'स्किप एडल्ट सीन'चं फिचर असल्याचा दावा करणारे व्हायरल स्क्रीनशॉट पूर्णपणे खोटे आहेत. ते फक्त ऑनलाईन शेअर केलेले खोटे स्क्रिनशॉर्ट्स आहेत.
जगभरातील अनेक युजर्स नेटफ्लिक्सला हे फिचर्स लॉन्च करण्याची विनंती करत आहेत, त्यांना आशा आहे की, यामुळे कुटुंबासह चित्रपट पाहणं सोपं होईल. पण आतापर्यंत, नेटफ्लिक्सनं हे फिचर्स जोडण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. प्लॅटफॉर्म या विनंतीचा विचार करेल की, दुर्लक्ष करेल आणि इतर फीचर्सवर लक्ष केंद्रीत करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























