शारीरिक संबंध एन्जॉयसाठी म्हणणाऱ्या नीना गुप्तांचं कधीकाळी विवियन रिचर्ड्स यांच्याशी होतं अफेअर, प्रेग्नंट झाल्यानंतर ...
neena gupta vivian rechards love story : सेक्स एन्जॉयसाठी असतो म्हणणाऱ्या नीना गुप्तांचं कधीकाळी विवियन रिचर्ड्स यांच्याशी होतं अफेअर, प्रेग्नंट झाल्यानंतर ...

neena gupta vivian rechards love story : दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळ स्थान निर्माण केलं होतं. नीना यांनी सुरुवातीच्या काळात टिव्ही मालिकेतून आणि नंतरच्या काळात सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सुरुवातीच्या काळात नीना गुप्ता यांनी मोठा संघर्ष केला होता. दरम्यान, नंतरच्या काळात नीना गुप्ता यांचं महान क्रिकेटर विवियन रिचर्ड यांच्याशी अफेअर सुरु झालं होतं. नीना गुप्ता यांनी त्यांच्या अफेअरला असलेला विरोध झुगारला होता. मात्र, नंतरच्या काळात गुप्ता यांनी मुलगी मसाबाला सोबत घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
नीना गुप्ता यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आलेले पाहायला मिळाले. सिंगल मदर असण्यापासून ते तिच्या अभिनय कारकिर्दीपर्यंत मीडियामध्ये तिच्याबद्दल कायम चर्चा होत राहिल्या. मात्र, वयाच्या 42 व्या वर्षी, नीना शेवटी विवेक मेहरा या दिल्लीस्थित चार्टर्ड अकाउंटंटच्या प्रेमात पडली, त्याच्याशी तिने 2008 मध्ये लग्न केले.
View this post on Instagram
नीनाचे सर व्हिव्हियन रिचर्ड्ससोबतचे नाते कायम राहिले आणि एकदा फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता यांनी तिच्या आई-वडिलांचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले होते. त्यामुळे आम्ही नीना गुप्ता आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या लव्ह स्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली होती.
नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड यांचा रोमान्स 1980 च्या दशकाच्या शेवटी सुरू झाला. कर्णधार विवियन रिचर्डच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज क्रिकेट संघ एका मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. त्याकाळी विवियन रिचर्ड यांच्या महिला चाहत्यांची संख्या देखील मोठी होती.
दरम्यान, त्या काळी विवियन रिचर्ड विवाहित होते आणि त्यांना मुलं देखील होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीना आणि विवियन यांची भेट मुंबईतील एका पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांचं रिलेशनशिप सुरु झालं होतं. नीना गुप्ता प्रेग्नंट देखील झाल्या होत्या. मात्र, विवियन यांच्याशी विवाह करणे नीना यांना शक्य नव्हते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मिस्टर अँड मिसेज गार्डनर! गुजरातची कॅप्टन अॅश्लेचा गर्लफ्रेंड मोनिकासोबत धुमधडाक्यात विवाह






















